इडली (Idli)recipe in marathi
साहित्य: 3 वाट्या तांदूळ 1वाटी उडदाची डाळ 1 ½ चमचा मीठ कृती: सर्व प्रथम तांदूळ व उडदाची डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी चांगली धुवून मिक्सरमध्ये दोघांची पेस्ट बनवा. दोन्ही पेस्ट एकत्र करून 5-6 तास ठेवा यात चवीनुसार मीठ टाकावे. एक चमचा तेल घाला. गॅसवर इडली मेकरमध्ये पाणी गरम होऊ द्या. इडलीच्या साच्यामध्ये थोडे तेल लावा. त्यात हे मिश्रण योग्य प्रमाणात भरा. सर्व साचे भरल्यावर त्यांमध्ये ठेवून वरून झाकण लावून घ्या. पाच-दहा मिनिटे मध्यम आचेवर ठेवा. इडल्या चांगल्या होऊ द्या. दहा मिनिटानंतर गॅस बंद करून साचे बाहेर काढा सर्व इडल्या साच्यातून बाहेर काढून घ्या. नारळाची चटणी व सांबार सोबत गरमागरम खायला द्या. Pls subscribe zatpat recipes marathi Idli recipe