फ्राईड भेंडी (fried bhendi)recipe

भेंडी ही लहानापासून मोठ्या पर्यत सर्वांची आवडती भाजी आहे.मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी भेंडी ही उपयुक्त आहे. 
भेंडी खाल्याने मेंदूची कार्य सुरळीत चालू रहातात.शरीरातील ग्लुकोजची प्रमाण नियंत्रणात रहाते.
नेहमी तिच ती भेंडीची भाजी खाऊन मुले कंटाळून जातात. 
चला तर मग आज आपण झटपट फ्राईडभेंडी कशी बनवायची ते बघुयात. 
 
 
साहित्य:

10-12लहान भेंडी

1/2वाटी बेसन पीठ 

1चमचा गरम मसाला 

1/2चमचा जिरे पावडर 

1/2चमचा धने पावडर

दिड चमचा तिळाचा कूट 

हळद 

लाल तिखट चवीनुसार 

मीठ चवीनुसार 

तळण्यासाठी तेल 
Recipes in marathi
Fried bhindi (फ्राईड भेंडी)


कृती:

भेंडी स्वच्छ धुवून घ्या.

भेंडी कपड्याने पुसून घ्यावी.

10-15मीनिटे तशीच ठेवावी.

भेंडीची मागील देठ काढून टाकावी.

भेंडी उभी चिरून घ्यावी.

बाॅउल मध्ये तिळाचा कूट घ्यावा.
गरम मसाला घ्यावा.

यात जिरे व धने पावडर घालावी.

या मिश्रणात तिखट व मीठ घालावे.

हे मिश्रण हाताने मिक्स करून घ्यावे.

चिरलेल्या भेंडीत हे मिश्रण थोडे भरावे.

बाॅउलमध्ये बेसन पीठ मिक्स करून घ्यावे.

यात चवीनुसार मीठ व हळद घालावी.

पाणी घालून बेसन पीठ मिक्स करावे.

खुप पातळ किंवा घट्ट बनवू नये.

एका कढईत तेल गरम करत ठेवावे.

भेडीत मसाला भरून घ्यावा.

ती बेसन पीठात घालून फ्राय करावी.

ब्राऊन रंगावर तळून घ्यावी.

फ्राईड भेंडी गरमागरम सर्व्ह करावी.

Pls subscribe zatpat recipes marathi 

ब्रेड मसाला रेसिपीसाठी लिंक. 
https://aayubhagwat.blogspot.com/2021/09/bread-masala-churmarecipe-in-marathi.html

Comments

Popular Posts