सोयाबीन चिली(soyabean chilli)recipe in marathi
साहित्य:
2वाट्या सोयाबीन वडा,
1कांदा,
4चमचे टोमॅटो सॉस,
1सिमला मिरची,
1कप पत्ता कोबी,
आलं लसूण पेस्ट,
कोथींबीर तिखट व मीठ चवीनुसार ,
1चमचा गरम मसाला व तेल
कृती:
सोयाबीन चिली बनवताने अगोदर सिमला मिरची, कांदा व पत्ताकोबी लंबयाआकारात बारीक चिरून घ्यावी.
एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात सोयाबीन वडा 5मिनिटे ठेवावा. नंतर काढून त्यातील पाणी हाताने पिळून सर्व काढून घ्यावे. व पुर्ण कोरडा करून घ्यावा.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे. व त्यात सोयाबीन वडा शालो फ्राय करून घ्यावा.
त्यानंतर कढई मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी व जिरे घालून तडकून घ्यावेत. व त्त्या
त्यात कांदा घालावा व आलं लसूण पेस्ट घालावी. व लाल झाले वर कोबी व सिमला मिरची घालून नरम होईपर्यंत फ्राय करावे.
भाज्या नरम झाल्यावर त्यात तिखट व मीठ तसेच गरम मसाला घालून चांगले परतून घ्यावे. आता टोमॅटो सॉस टाकून चांगले परतून घ्यावे.
या मिश्रणात सोयाबीन वडा घालून नीट मिक्स करून घ्यावे व वरून कोथींबीर घालावी. 5मिनिटे फ्राय करावे.
गरमागरम सोयाबीन चिली सर्व्ह करावी.
अशा प्रकारे आपली झटपट सोयाबीन चिली तयार आहे.
टिप:साबुदाणा थालीपीठ रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/06/sabudana-thalipithrecipe-in-marathi.html
Pls subscribe Zatpat recipes marathi
Very nice 👌👌
ReplyDeleteThank you so much🙏
Delete