Amla candy(आवला कॅडी)recipe in marathi


आवळा हे फळ 'क'जीवनसत्व असणारे आहे. आवळा हा चवीला तुरट असल्यामुळे आरोग्यासाठी गुणकारी असला तरी अनेक जण खात नाहीत, यात जीवनसत्वे, अनेक खनिज पदार्थ आहेत. चला तर मग आज आपण या गुणकारी आवळयाची 'आवळा कॅडी' बनवायला अगदी सोपी व झटपट कशी बनवायची ते बघूया. ही आवळा कॅडी  नक्की करून बघा लहान मुलांना तसेच मोठयानाही खुप आवडेल.

साहित्य: 250grm आवळा,
250ग्रॅम साखर

कृती:सर्व प्रथम आवळे कुकर मध्ये पाणी घालून चांगले उकडून घ्यावेत.
 साधारण 5-6शिट्या मध्ये आवळे चांगले उकडले जातात. 
                                                                   
आवला कॅन्डी रेसिपी
Amla candy(आवला कॅडी)recipe

उकडून घेतलेले आवळे थंड झाले. कि चाकूच्या सहाय्याने काजूचया आकारात किंवा तुम्हाला आवडतील त्या आकारात कापून घ्यावेत.त्यातील बिया काढून घ्याव्यात. 
कापून घेतलेले आवळे एका डब्यात टाकून त्यात वरून साखर पसरून टाकावी.साखरेच्या सहाय्याने आवळयाचे सर्व काप झाकले जायला हवेत. 
आता डब्बाचे झाकण लावून घ्यावे. हा डब्बा 3दिवस तसाच ठेवावा. अजिबात उघडू नये.
3दिवसानंतर डब्यातले काप एका चाळणीत काढून घ्यावेत. साखरेचा पाक बनलेला असतो, तो पुर्ण निरपून घ्यावा. व एका ताटात ही आवळा कॅडी 2दिवस वाळायला ठेवावी. उन्हात वाळवू नये. घरातच वाळवावी.

अशा प्रकारे आपली आवला कॅडी तयार आहे. 

टिप:1)साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करता येते. 
2)आवला कॅडी वाळलयानंतर तिला 3-4 चमचे पिठी साखर लावल्यास चवदार लागते.
3)आवला कॅडी काढल्या नंतर जो पाक उरतो, तो फेकून न देता त्याचा वापर आवळा ज्युस म्हणून करावा. हे ज्युस चवीला छान लागते. तसेच आरोग्यासाठी लाभदायक आहे.
 



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 


टिप:व्हेज मंचूरियन रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/10/veg-manchurian-recipein-marathi.html

Comments

Post a Comment

तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you

Popular Posts