बालूशाही (Balushahi)recipe in marathi
गोड पदार्थांचे नाव ही घेतले तर सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. त्यात बालूशाही म्हटले की सगळ्याची आवडती.आज आपण अगदीच सोपी पध्दत वापरून बालूशाही झटपट बनवणार आहोत.
साहित्य :
5कप मैदा,
1/2बेकिंग पावडर,
3-4 चमचे दही,
एक कप दूध,
4कप साखर,
4कप पाणी,
तळण्यासाठी 6-7चमचे तूप
मैदा व सोडा एकञ करून त्यात दही घालून नीट मिक्स करून घ्यावे .
व त्यात गरजेनुसार थोडे थोडे दूध घालून घट्ट कणीक मळून घ्यावी.व एक सुती कापड घेऊन 10मिनिटे कणीक झाकून ठेवावी.
हे मिश्रण सेट होईपर्यंत एका पातेल्यात साखर व पाणी घालून एकतारी पाक बनवून घ्यावा.
त्यानंतर कणकेचे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करावेत व त्याना हाताने दाबून बालूशाहीचा आकार दयावा.
सगळ्या बालूशाही बनवून झाल्यावर एका कढईत तूप गरम करून त्यात बालूशाही मंद आचेवर तळून घ्याव्यात.
व तळलेल्या बालूशाही पाकात 20-25 मिनिटे ठेवून नंतर डिश मध्ये काढून घ्याव्यात.
टिप:
पाक बनवताने नेहमी जेवढे साखरेचे प्रमाण आहे तेवढेच पाणी घालावे.
टिप:मॅगो/आंबा बर्फी रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/blog-post_28.html
Zatpat recipes marathi नक्की subscribe करा.
Mast 👌👌
ReplyDeleteVery nice 👌👌👍👍
ReplyDeleteThank you dear
Delete