Rice puri(राईस पुरी)recipe in marathi

कधी कधी आपण जास्त भात बनवतो. मग या उरलेल्या भाताच करायचं काय?हा प्रश्न सगळ्यात अगोदर पडतो. यावर एक उत्तम,चविष्ट व रूचकर पर्याय म्हणजे राईस पुरी .वेगळा व पौष्टिक असा हा पदार्थ झटपट कसा बनवायचा ते बघुयात. 

साहित्य:
1वाटी भात(राईस),
2लहान चमचे मैदा,
1/2चमचा लाल तिखट,
चवीनुसार मीठ, 
थोडीशी हळद,
1/2चमचा जिरे पावडर, 
1/2वाटी कोथिंबीर, 
तळण्यासाठी तेल 

कृती: प्रथम शिजवलेला भात व मैदा एका ताटात एकञ करून घ्या. 
आता या मिश्रणात हळद,जिरे पावडर,लाल तिखट,कोथिंबीर,चवीनुसार मीठ घालुन हे मिश्रण एकञ करून घ्या. 
आता याची कणीक मळवून घ्या.या कणकेच्या लहान लहान पुरया लाटून घ्या.
आता एका कढईत तेल गरम करत ठेवावे. 
तेल गरम झाले कि त्यात मध्यम आचेवर पुरया ब्राऊन रंगावर तळून घ्या. 
गरमागरम पुरी सर्व्ह करावी. 

टिप: तांदूळाचे पिठ वापरून देखील ही पुरी बनवता येते. 
Recipe in marathi
Rice puri((राईस पुरी)recipe 


टिप:कारलयाचे लोणचे रेसिपी पाहणयासाठी. 

 https://aayubhagwat.blogspot.com/2021/06/bittergourd-picklerecipe-in-marathi.html



Zatpat recipes marathi subscribe करा.

Comments

Popular Posts