पनीर मटर रेसिपी (paneermatar recipe)in marathi
लहानापासून मोठ्यापर्यत पनीर सर्वांना आवडते.हे चविष्ट तर आहेच त्याबरोबर पौष्टिक पण आहे.यात हिरवे मटर टाकल्यास त्याची चव व पौष्टिकता आणखीच वाढते.
चला तर मग आज आपण झटपट पनीर मटर रेसिपी कशी बनवायची ते बघुयात.
साहित्य:
1मोठी वाटी मटर,
200ग्रॅम पनीरचे पिस,
1मोठे टोमॅटो,
1कांदा,
पनीर मसाला 3चमचे,
चवीनुसार मीठ व तिखट,
आलं लसूण पेस्ट,
1चमचा जिरे पावडर,
कोथींबीर,
1कप दुध,
तेल.
कृती:
पनीरचे पिस बनवून घ्यावे.एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात शालो फ्राय करावे.
कांदा,टोमॅटो मिक्सरमधून बारीक करावे.
मटर उकडून घ्यावेत.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे.त्यात जीरे पावडर घालावी.
नंतर त्यात आलंलसूण पेस्ट घालावी.थोडासा कांदा घालून ब्राऊन रंगावर तळून घ्यावा.
त्यात मिक्सरमधून बारीक करून कांदा.टोमॅटोची पेस्ट घालावी.
तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.पनीर मसाला दुधात मिक्स करून फ्राय करावे.
त्यात लाल तिखट व मीठ घालून चांगले परतून घ्यावे.
त्यानंतर मटर घालून 5मिनिटे फ्राय करावे.आता फ्राय केलेले पनीरचे पीस घालून 2मिनिटे फ्राय करावे.नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळून घ्यावे.कोथींबीर घालावी.
गरमागरम पनीर मटर मसाला पोळी सोबत सर्व्ह करावा.अशा प्रकारे झटपट पनीर मटर मसाला रेसिपी तयार आहे.
टिप:आवडत असेल तर मटर आणखी वापरू शकता.
भाजीत पाणी शक्यतो गरम करून टाकावे.त्यामुळे भाजीचा रंग आहे तसाच राहील.
पनीरचे पिस फ्राय न करता ही टाकू शकतो.
Pls subscribe zatpat recipes marathi
झटपट रेसिपी मराठी रेसिपी तुम्हाला आवडल्या तर शेअर करायला विसरू नका.
Note:स्वीटकाॅन ढोकळा रेसिपीसाठी बघा.
https://aayubhagwat.blogspot.com/2021/07/sweet-corn-dhoklarecipe-in-marathi.html
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you