उपवासाचे आप्पे(Upvasache Aappe)recipe in marathi

उपवासाचा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात.चला तर मग आज आपण झटपट उपवासाचे आप्पे कसे बनवायचे ते बघुयात.
साहित्य:
1वाटी भगर,
1/2वाटी साबुदाणा, 
1/2 लहान चमचा खाण्याचा सोडा, 
4-5हिरव्या मिरचीची पेस्ट,
1/2वाटी दही,
चवीनुसार मीठ, 
2चमचे तेल

कृती:
अगोदर साबुदाणा मिक्सर मधून जाडसर काढून घ्या.
या साबुदाणा मध्येच मिक्सर मधून भगर काढून घ्या. 
जास्त जाडसर किंवा बारीक करू नका.रवाळ काढून घ्या. 
आता हे मिश्रण एका बाॅउल मध्ये काढून घ्यावे.
या मिश्रणात दही,मिरचीची पेस्ट,मीठ व खाण्याचा सोडा मिक्स करून घ्या. 
हे मिश्रण 15-20मिनिटे झाकून ठेवावे. 
आता आप्पे पाञ गॅसवर गरम करायला ठेवावे.
Recipe in marathi
Upvasache Aappe(उपवासाचे आप्पे)recipe 

यात बनवलेले मिश्रण घाला.व थोड थोडे तेल सोडा.
आता मागच्या बाजूने पलटून थोडे थोडे तेल सोडा.
दोन्ही बाजूंनी चांगले भाजले कि गरमागरम उपवासाचे आप्पे सर्व्ह करावे.

Pls subscribe zatpat recipes marathi 

 टिप:भगरीचे वडे रेसिपी पाहणयासाठी 
https://aayubhagwat.blogspot.com/2021/07/bhagar-variche-vaderecipe-in-marathi.html

Comments

Popular Posts