मसाला अळू वडी (masala aalu vadi)recipe in marathi

अळूची पाने ही औषधी गुणधर्म असलेली आहेत.
याचे अनेक गुणधर्म आहे.
अळूच्या पानामध्ये vitamins A,B,C असते.
तसेच कॅल्शियम देखील आहे. 
ही भाजी डोळयासाठी,सांधेदुखी साठी चांगली आहे.
मसाला अळू वडी झटपट कशी बनवायची ते बघुयात. 
Recipes in marathi
मसाला अळू वडी (masala aalu vadi)

साहित्य:
4अळूची पानं
1/2चमचा जिरे पावडर
1मोठा कांदा बारीक चिरून
3चमचे गरम मसाला
3-4चमचे शेंगदाणे कूट
1मोठा चमचा बेसन पीठ
हळद
चवीनुसार तिखट व मीठ

कृती:
अळूची पाने स्वच्छ धुवून घ्या.
एका बाॅउलमध्ये बेसन पीठ घालावे.
थोडेसे तिखट मीठ घालावे.
हे पीठ पाणी घालून मिक्स करावे.
घट्टसर ठेवावे पातळ करू नये.
पानावर बेसन पीठ घालून त्याची घडी/वडी घालावी.
एका पॅनमध्ये 1चमचा तेल घालून वडी त्यावर ठेवावी.
वरून झाकण ठेवावे.
2मिनिटे ठेवावे.
नंतर साईड बदलावी.
आता त्याच्या लहान लहान वड्या पाडावे.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे.
त्यात जिरे पावडर घालावी.
कांदा बारीक चिरून घ्यावा.
कांदा ब्राऊन रंगावर तळून घ्या.
आता त्यात 1चमचा लाल तिखट.
गरम मसाला घालून फ्राय करावे.
शेंगदाणे कूट घालून फ्राय करावे.
थोडे पाणी घालून फ्राय करावे.
आता अळू वड्या टाकून 4-5मिनिटे फ्राय करावे.
वरून कोथिंबीर घालावी.
गरमागरम मसाला अळू वडी पोळी,पराठे.
भाकरी सोबत सर्व्ह करावी.
अशा प्रकारे आपली झटपट मसाला अळू वडी तयार आहे.


 pls subscribe zatpat recipes marathi 




https://aayubhagwat.blogspot.com/2021/09/bread-masala-churmarecipe-in-marathi.html


 

Comments

Popular Posts