गाजराचा हलवा (carrots halva)recipe in marathi

गाजराचा हलवा हे नाव जरी ऐकले की तोंडाला पाणी सुटते. 
गाजर हे आरोग्याच्या दृष्टीने एक उपयुक्त आहे. गाजरमधये व्हिटमिन Aअसते. ते आपल्या डोळयासाठी खुप गरजेचे आहे. त्यामुळे गाजर खावीत.
गाजराचे विविध पदार्थ आपण बनवत असतो.चला तर मग आज आपण झटपट गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बघुयात. 

साहित्य :

3-4वाट्या गाजराचा किस
1 1/2वाटी दुध
2लहान चमचे तूप
1वाटी साखर
1/2चमचा विलायची पावडर
ड्राय फ्रूट आवडीनुसार

कृती:
गाजर स्वच्छ धुवून घ्या.
गाजराचा किस बनवून घ्या.
एका पॅन मध्ये तूप घालावे.
गाजराचा किस पॅन मध्ये घालून 4-5मिनिटे फ्राय करावे.
त्यात दूध घालावे.
नंतर साखर घालावी.
विलायची पावडर घालून फ्राय करावे.
पुर्ण कोरडे झाले वर त्यात ड्राय फ्रूट घालावे.
गरमागरम हलवा सर्व्ह करावा.


Pls subscribe zatpat recipes marathi
Recipes in marathi
 गाजराचा हलवा

बटाटा चटणी रेसिपी लिंक.  
https://aayubhagwat.blogspot.com/2022/02/batata-chatni-recipe-in-marathi.html




https://youtu.be/Yv8hBZ5b2dQ

Comments

Popular Posts