आप्पे (aappe)recipe in marathi

साहित्य:
1वाटी तांदुळ, 
1वाटी हरभरा डाळ, 
1/2वाटी उडीद डाळ, 
1वाटी मुग डाळ,
3-4हिरव्या मिरच्या, 
आलं लसूण पेस्ट, 
1मोठा कांदा बारीक चिरून , 
2टोमॅटो बारीक चिरलेला, 
कोथींबीर, 
हळद व चवीनुसार मीठ, 
तेल

कृती:
तांदुळ व डाळी 7-8तास वेगवेगळ्या भिजवा.नंतर त्याला मिक्सर मधून काढून घ्यावे. व त्याच्या मध्ये हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट,हळद, कांदा, टोमॅटो, कोथींबीर व मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे.पीठ खुप पातळ करू नये. 

हे मिश्रण 1-2तास झाकून ठेवावे व नंतर आप्पे पाञाला सगळ्या गोल मध्ये थोडे तेल लावून त्यात मिश्रण टाकावे.
व झाकण ठेवावे, 3मिनिटे ठेवून त्याला खाली वर करून मागच्या बाजूला ठेवून थोडं थोडं तेल सोडून नीट भाजून घ्यावे. गरमागरम आप्पे झटपट  सर्व्ह करावे.

टिप:
1)इडली पिठाचे आप्पे देखील छान होतात.
2)हिरव्या मिरची ऐवजी लाल तिखट वापरले तरी चालेल.
मराठी रेसिपी
आप्पे(Aappe)रेसिपी 


टिप:स्वीट रसगुल्ले रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/blog-post_33.html




Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

Popular Posts