स्वीटकॉर्न ढोकळा(sweet corn dhokla)recipe in marathi

Recipes in marathi
Sweet corn dhokla(स्वीटकॉर्न ढोकळा )recipe 

स्वीटकॉर्न ढोकळा हा गुजरात मध्ये जास्त प्रमाणात बनवला जातो.हा ढोकळा बनवायला अगदी सोपा व झटपट बनणारी रेसिपी आहे.तसेच पौष्टिक देखील आहे.
 नेहमी आपण रवा व बेसन पीठ वापरून ढोकळा बनवतो.पण आज आपण मकाचे पीठ व रवा वापरून ढोकळा कसा बनवायचा ते बघुयात. 

साहित्य:
1वाटी उकडून स्वीटकॉर्नचे दाणे,
एक कप रवा,
1/2 कप दही,
हळद,
मीठ,
एक चमचा तेल,
मोहरी,
हिरव्या मिरच्या,
कढीपत्ता,
कोथिंबीर,
1/2 टी स्पून इनो/बेकिंग पावडर 

कृती:
सर्व प्रथम स्वीटकाॅनचे दाणे उकडून घ्यावेत.त्यानंतर ते मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्यावी. 
आता या पेस्टमध्ये रवा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. 
या मिश्रणात दही,मीठ,हळद,घालून चांगले एकजीव करुन घ्यावे. 
नेहमी ढोकळा बनवतो.त्याप्रमाणात पाणी घालून हे मिश्रण गरजेनुसार पातळ करून घ्यावे. 
आता ढोकळा बनविण्यासाठी इडली पाञात पाणी घालून ते गरम करत ठेवावे.
एका प्लेटला तेल लावून ती इडली पाञात ठेवून द्यावी. 
आता बनवलेले मिश्रण घेऊन त्यात इनो टाकावा.पटापट हलवून ते प्लेटमध्ये टाकावे.
झाकण लावून ठेवावे. 
10-15 मिनिटे मध्यम आचेवर ठेवावे.आता ढोकळा तयार आहे.
आता एका पॅन मध्ये तेल गरम करत ठेवावे.त्यात मोहरी तडकून घ्यावी.
हिरव्या मिरचीचे काप टाकावेत.कढीपत्ता घालावा.आता ढोकळा थंड झाला.त्यावर फोडणी टाकून चमचाने मिश्रण पसरून घ्यावे.
वरून कोथिंबीर घालावी.
तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्यावा. 
अशा प्रकारे आपली स्वीटकॉर्न ढोकळा रेसिपी तयार आहे.
हा ढोकळा टोमॅटो सॉस बरोबर झटपट सर्व्ह करावा.

राईस पुरी रेसिपी पाहणयासाठी. 
https://aayubhagwat.blogspot.com/2021/07/rice-puri-recipe-in-marathi.html



Zatpat recipes marathi subscribe करा.
(झटपट रेसिपी मराठी सबसक्राईब करा.)

Comments

Post a Comment

तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you

Popular Posts