2-4वर्षांच्या मुलांना कसे शिकवाल?

2-4वर्षाच्या मुलांना कसे शिकवाल 


"मुले ही देवाघरची फुले असतात."असे आपण म्हणतो. पण जेव्हा मुलांना शिकवण्याची वेळ येते. तेव्हा पालक हे विसरून जातात. व त्यांच्या शिक्षणासाठी चुकीची पध्दत वापरतात.त्याना रागवतात, धमकावतात, भिती दाखवतात.यामुळे मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करू लागतात.
 अशा परिस्थितीत पालकांना जास्त टेन्शन येते. व ते मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी अधिकाधिक पर्यत करतात.व मुलांवर अभ्यासाचे ओझे लादतात.परंतु या ओझ्याखाली त्याची चिमुरडी मुले दबून जातायेत. याचे भान ही त्याना राहत नाही.मुलांना अभ्यास करायला सांगा पण तो हसत खेळत. यामुळे ती आनंदी तर राहतीलच आणि अभ्यासात देखील रस घेतील.
 आजचे युग हे competitive आहे.यात टिकायच असेल तर शाळा,टिवशन, वेगवेगळे क्लासेस हेच मुलाचं विश्व बनून जाताना दिसत आहे.स्पर्धेच्या या जगात कसे समोर जायचे हा प्रश्न सर्व पालक व मुलांना भेडसावत आहे.आज आपण 2-3 वर्ष मुलांना झाली की त्याना शाळेत टाकतो.शाळेत टाकण्याच्या विरोधात मी अजिबात नाहीये. पण शाळेत जायला लागला कि "अभ्यास कर, अभ्यास कर"याच्या विरोधात आहे. हे न करता आपण मुलांना खेळत खेळत अभ्यास कसा करून घ्यायचा ते बघणार आहोत.
मुलांना हवेय त्यापेक्षा जास्त आणुन दिले कि मुले आपले सगळे एकतील हा समज अगदी चुकीचा आहे.उलट ते हट्ट करायला शिकतील. आज आपण 2-4वर्षांच्या मुलाविषयी बोलणार आहोत. 
1)मुलांना वेगवेगळे खेळणी दया:
 माझे लहान मुलं शाळेतून आले की फक्त खेळत असते.Homework करत नाही.एखादे पुस्तक हातात घेऊन ते साधे बघतही नाही अशी अनेक पालकांची तक्रार असते. आता तुम्हीच मला सांगा 2-3वर्ष मुले 3-4तास शाळेत जातात. मग घरी येऊन ते काय अभ्यास करणार ?आपण मोठे असून आपल्या regular routine कंटाळून जातो.मग ही तर लहान लहान मुले आहेत.
 त्या पेक्षा तुम्ही जर त्याना एकच एक खेळणी न देता वेगवेगळे खेळणी त्याना द्या. वेगवेगळ्या vehicles,वेगवेगळे plastic animals,bolling games इत्यादी.याने काय होईल मुले कोणत्या vehicles/वाहनांना काय म्हणतात हे कळले.प्राणी ओळखणे शिकतील.blocks आणा त्यातून ते tower's, building बनवतील त्यामुळे त्याची कल्पना शक्ती वाढेल.
2)बाहेर खेळायला/फिरायला घेऊन जा:
मुलांना बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जा. कधी पार्क तर कधी झू मध्ये त्याच्याशी खेळा. त्याना प्राण्यांची नावे सांगा, ते कोठे राहतात. काय खातात याविषयी माहिती द्या. यामुळे त्याची जाणून घेण्याची जिज्ञासा वाढेल.ते अधिकाधिक प्रश्न विचारतील त्याची उत्तरे द्या. हाच दिर्घ काळ लक्षात राहण्याचा मार्ग आहे. लहान असो वा मोठे एखादी बघून समजून घेतलेली गोष्ट कधीच विसरत नाहीत. 
3)मुलांना पुरेसा वेळ दया:
गृहिणी असो वा ऑफिस वुमन दोघी कडे ही वेळच नसतो.त्यात थोडासा वेळ काढला की ,लगेच आईच सुरू होते पिल्लू तु नंतर खेळ बुक घेऊन ये.मी तुझा अभ्यास घेते.असे न करता जर तुम्ही मुलांना त्याचे सगळे खेळणी आणायला सांगितली व त्याची शाॅप बनवायला सांगितली. तर यातून खेळता ही येईल व शिकवणे पण होईल. कसे ते बघा.-खेळणी विकत घेताने तुम्ही त्याला पैसे द्याल ते पैसे किती आहेत हे त्याला कळेल यातून त्याला पैसाची ओळख होईल.तसेच बाहेर गेल्यावर खरेदी कशी करायची हे देखील समजते.याबरोबर खेळणी ही वेगवेगळ्या कलरची असते.त्यामुळे त्यातून कलर शिकवता येतील. Counting शिकवता येईल.अशा प्रकारे खेळणे ही होईल, अभ
शिकता ही येईल. व सगळ्यात महत्वाचे पालक मुलांसोबत  खेळत नाहीत.वेळ देत नाहीत असेही मुलांना वाटणार नाही.
4)नाही म्हणणे सोडा:
मुलांना नेहमी नाही म्हणणे सोडा. त्यामुळे ते negative बनतील. त्याना समजामुलानिवून सांगा.तरीही ऐकत नसतील त्याना अनुभव घेऊ दया.त्या शिवाय ते ऐकणार नाहीत. अनुभव चांगला की,वाईट यावरून ते खुप शिकतील.म्हणतात ना अनुभवाशिवाय दुसरा पर्यायही नाहिये.
5)किचन मध्ये येऊ द्या:-
2-4वर्षाचे मुलं किचन मध्ये काय करणार?हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आपण विविध भाज्या आणतो.त्याची नावे मुलांना सांगा. त्या खाल्याने आपल्या शरीराला कोणते पोषक घटक त्यातून मिळतात.हे समजावून सांगा. यामुळे ते भाजी ही खातील व त्या विषयी माहिती ही मिळेल.
अशा प्रकारे मुलाकडून हसत खेळत अभ्यास करून घेतला तर ते नक्कीच बोअर नाही होणार.आपण काय करतो मुलांना पुस्तक ,पेन व वही देतो.तु अभ्यास कर मी तुला शिकवते.असे करतो.हे चुकीचे आहे त्यापेक्षा मुलांना घेऊन तुम्ही स्वत हा बसा.त्याच्या सोबत खेळा,त्याना शिकवा.त्याना वेळ दया. 

हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा. वेगवेगळ्या रेसिपी, स्टोरी यासाठी Zatpat recipes marathi subscribe करा.

Pls follow, subscribe, like n comments 
aayubhagwat.blogspot.com 

Comments

Popular Posts