चायनीज कोबी पकोडा (Chinese kobi pakoda)=
साहित्य:
1कप कोबी उभा चिरलेला
1/2कप सिमला मिरची चिरलेली
1कप मैदा
1/2 कप तांदूळ पीठ
1/2चमचा काळीमिरी पावडर
1 चमचा चिली फ्लेक्स
आलं लसूण पेस्ट
मीठ चवीनुसार
2 चमचे टोमॅटो सॉस
2चमचे शेजवान सॉस
तळण्यासाठी तेल
पाणी गरजेनुसार
कृती
सर्व साहित्य घ्यावे.
एका बाॅउल मध्ये चिरलेली कोबी घ्यावी.
तसेच सिमला मिरची घ्यावी.
आलं लसूण पेस्ट व चिली फ्लेक्स घालावे.
मिरे पावडर व मीठ घालून मिक्स करावे.
मैदा व तांदूळाचे पीठ टाकून हलवून घ्यावे.
थोडे पाणी घालून एकजीव करावे.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे.
या मिश्रणाचे पकोडे तळावेत.
एका बाॅउल मध्ये टोमॅटो सॉस.
शेजवान साॅस घालून मिक्स करावे.
त्यात पकोडे मिक्स करून घ्यावे.
गरमागरम चायनीज कोबी पकोडा सर्व्ह करावा.
छोले भटूरे रेसिपी पाहणयासाठी
https://aayubhagwat.blogspot.com/2021/08/chole-bhaturerecipe-in-marathi.html
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you