छोले भटूरे(Chole bhature)recipe in marathi


आज आपण छोले भटूरे रेसिपी झटपट कशी बनवायची ते बघुयात.
आजची रेसिपी बनवायला झटपट व चविष्ट आहे.
साहित्य(छोलेसाठी):
1कप छोले(हरभरे)
2मोठे कांदे बारीक चिरून
2टोमॅटो बारीक चिरून
1चमचा बेसन पीठ
2-3तेजपतता
1चमचा धने पावडर
1-2चमचे गरम मसाला
चवीनुसार लाल तिखट व मीठ
1/2चमचा हळद
1चमचा जिरे
कोथिंबीर 
तेल

साहित्य(भटूरेसाठी):
2वाटी मैदा 
1/2वाटी गरा/रवा
1/2वाटी दही
1चमचा  बेकिंग पावडर
1चमचा/चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
कृती (छोले):
छोले राञभर पाण्यात भिजवावे.
कुकर मध्ये 5-6शिट्या काढून छोले शिजवावे. 
Recipe in marathi
Chole bhature(छोले भटूरे)

एका कढईत तेल गरम करत ठेवावे.
आता त्यात जिरे घालावेत.
यात कांदा घालून ब्राऊन रंगावर फ्राय करावा.
नंतर टोमॅटो घालून फ्राय करावे.
आता यात बेसन पीठ घालून 3-4मिनिटे फ्राय करावे.
यात चवीनुसार मीठ व लाल तिखट घालावे.
गरम मसाला व धने पावडर घालून फ्राय करावे.
यात छोले घालून फ्राय करावे.
2कप पाणी घालून 5-6 मिनिटे मध्यम आचेवर ठेवावे.
,वरून कोथिंबीर घालावी.
अशा प्रकारे आपले छोले तयार आहेत.
हे छोले तुम्ही पराठा,कुलचे,भटूरे या सोबत खाऊ शकता.

कृती(भटूरे):
 एका ताटात मैदा व रवा घ्यावा.
यात बेकिंग पावडर,1चमचा तेल,दही घालावे. 
हे मिश्रण हाताने एकजीव करून घ्यावे.
यात चवीनुसार मीठ घालावे.
या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून कणीक मळवावी.
एका बाॅउल मध्ये कणकेचा गोळा तेल लावून ठेवावा.
किमान 3तास झाकून ठेवावा.
आता याचे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करावेत. 
आता लहान लहान पुरया लाटून घ्या.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे.
त्यात हे भटूरे ब्राऊन रंगावर तळून घ्यावेत.
गरमागरम छोले भटूरे सर्व्ह करावेत.

टिप:मिसळपाव रेसिपी साठी.
 https://aayubhagwat.blogspot.com/2021/08/misal-pav-recipein-marathi.html

Comments

Popular Posts