बटाट्याची चटणी (batata chatni recipe in marathi)
साहित्य:
2बटाटे
1 मोठा कांदा
1/2जिरे पावडर
1/2मोहरी
1चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ
हळद
कोथिंबीर
कढीपत्ता
2चमचा तेल
कृती:
बटाट्याची साल काढून घ्या.
बटाटे बारीक चिरून घ्या.
बटाटे खलबत्ता कुटून घ्या.
बटाटे पाण्याने धुवून हाताने पिळुन घ्या.
कांदा बारीक चिरून घ्यावा.
कढईत तेल गरम करत ठेवावे.
त्यात मोहरी,जिरे तडकून घ्या.
कांदा ब्राऊन रंगावर तळून घ्या.
चवीनुसार तिखट व मीठ घालावे.
कुटलेला बटाटा घालुन नरम होईपर्यंत परतावा.
कोथिंबीर व कढीपत्ता घालावा.
अशा प्रकारे बटाट्याची चटणी तयार आहे.
टिप:
बटाटा तुम्ही किसनीने किसुन घेऊ शकता.
कांदा भरपुर घालावा.
बटाटा मध्यम आचेवर फ्राय करावा.
पाणी अजिबात घालू नये.
https://aayubhagwat.blogspot.com/2021/09/fried-bhendirecipe.html
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you