भगर/वरीच्या तांदूळाचे वडे(bhagar/ variche vade)recipe in marathi
उपवासाचा दिवस आला कि टेन्शन येते साबुदाणा खिचडी तर बनवायची असते. पण त्या सोबत आणखी काही तरी चटपटीत बनवायची इच्छा असते अशा वेळी झटपट बनणारा भगरीचा/वरीचा वडा हा उत्तम पर्याय आहे.
चला तर मग बघुयात भगर/वरीच्या तांदूळाचे वडे कसे बनवायचे.
साहित्य:
1वाटी भगर/वरीचे पिठ,
3-4हिरव्या मिरच्या पेस्ट,
1मध्यम आकाराचा बटाटा किसून,
2-3चमचे शेंगदाणे कूट,
मीठ चवीनुसार,
तळण्यासाठी शेंगदाणे तेल/साजुक तुप
कृती:
भगर स्वच्छ धुवून घ्या. ती वाळवून तिचे मिक्सर मधून बारीक पिठ करून घ्यावे.
आता एका बाॅउल मध्ये भगरीचे पिठ,हिरव्या मिरचीची पेस्ट घालावी. तसेच बटाट्याचा किस,शेंगदाणे कूट व मीठ घालावे.
हे मिश्रण हाताने एकजीव करून घ्यावे. या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून कणीक मळवून घ्यावी.
10-15 मिनिटे ही कणीक कपडयाचया साहाय्याने झाकून ठेवावी.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे. तळहातावर लहान लहान वडे बनवावे. हे वडे मध्यम आचेवर ब्राऊन रंगावर तळून घ्यावे व गरमागरम भगरीचे/वरीचे वडा सर्व्ह करावे.
तुम्ही शेंगदाणे कूट,लाल तिखट व मीठ तसेच थोडे पाणी घालून चटणी बनवू शकता. त्यावर तेल घेतले की छान लागते.
टिप:उपवासाला तुम्ही जिरे व कोथिंबीर खात असाल तर ती वापरा.
Pls subscribe zatpat recipes marathi
टिप:पनीर मटर रेसिपी पाहणयासाठी
https://aayubhagwat.blogspot.com/2021/07/paneer-matar-recipein-marathi.html
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you