मिसळपाव (Misalpav recipe)in marathi


तेच ते खाऊन कंटाळलात?
चला तर मग आज आपण चटपटीत मिसळपाव झटपट  बनवुयात.

साहित्य:
1वाटी मटकी(भिजवलेली),
2मोठे कांदे,
2टोमॅटो, 
2चमचे बेसन पीठ,
1चमचा लाल तिखट, 
1चमचा कांदा लसूण मसाला,
आलं-लसूण पेस्ट,
चवीनुसार मीठ,
1चमचा जिरे पावडर,
1/2हळद, 
3-4चमचे तेल
1वाटी मुरमुरे, 
1वाटी बारीक शेव,
कोथिंबीर  
कृती:
सर्व प्रथम कांदे व टोमॅटो बारीक चिरून घ्या.
बेसन पीठ चांगले मध्यम आचेवर भाजून घ्यावे.
आता एका कढईत तेल गरम करत ठेवावे. 
त्यात जिरे पावडर घालावी. 
त्या नंतर आलं लसूण पेस्ट घालावी. 
यात कांदा घालून ब्राऊन रंगावर फ्राय करावे.
त्यात टोमॅटो घालून फ्राय करावे.
हे मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे.
आता यात लाल तिखटव मीठ घालावे.
तसेच कांदा लसूण मसाला घालून नीट परतून घ्यावे.
यात बेसन पीठ घालून फ्राय करावे. 
आता यात भिजलेली मटकी घालावी. 
यात दिड ग्लास पाणी गरम करून घालावे.
उकळी आली की मध्यम आचेवर  4-5 मिनिटे ठेवावे.
अशा प्रकारे आपला मिसळपाव कट तयार आहे.
आता एका बाॅउल मध्ये फरसाण घ्यावे.
यात थोडे मुरमुरे घालावेत.
यात बारीक शेव व कोथिंबीर घालून त्यावर कट घालावा.
यावर बारीक चिरून कांदा, टोमॅटो व लिंबू घालावे. 
Recipe in marathi
Misal pav ( मिसळपाव )

अशा प्रकारे झटपट मिसळपाव रेसिपी सर्व्ह करावी.

टिप:मटकी 7-8 तास भिजवून घ्यावी.
वाटल्यास उकडून घ्यावी. 
कटसाठी पाणी गरम करून टाकावे.रंग बदलणार नाही. 

टिप: 
Pls subscribe Zatpat recipes marathi 

उपवासाचे अप्पे रेसिपीसाठी
https://aayubhagwat.blogspot.com/2021/07/upvasache-aapperecipe-in-marathi.html

Comments

Popular Posts