कारल्याचे लोणचे (Bittergourd pickle)recipe in marathi
कारले हे चवीला कडू असल्याने शक्यतो ते लहान मुले.तसेच मोठयानाही आवडत नाही. पण याच कारल्याचे वेगळे पदार्थ सगळ्याना नक्की आवडतील. चला तर मग आज आपण बनवूया कारल्याचे लोणचे.अगदी कमी वेळात झटपट बनणारी रेसिपी आहे.
साहित्य:
2कारली,
4चमचे मोहरीची डाळ,
1-2चमचे लोणचे मसाला
आलं-लसूण पेस्ट,
लाल तिखट-1चमचा,
मीठ 2चमचे मध्यम आकाराचे (चवीनुसार),
हळद-1चमचा,
तेल-2मोठे चमचे,
कृती:
कारली स्वच्छ धुवून घ्यावीत.
कारल्याच्या आतील बिया काढून टाकाव्यात. व कारल्याच्या लहान लहान फोडी गोल/आडव्या
करून घ्यावात.
कारल्याचे लोणचे (Bittergourd pickle)recipe |
करून घ्यावात.
आता ही कारली 2-3तास एका प्लेट मध्ये 1-2चमचे मीठ टाकून ठेवावीत.
2तासानंतर एका पातेल्यात पाणी घालून कारल्याच्या फोडी 5-6मिनिटे उकडून घ्याव्यात.
उकडून घेतलेल्या फोडी एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्याव्यात.
आता एका लहान पातेल्यात तेल गरम करून घ्यावे.
गरम तेल थोडयावेळ तसेच ठेवावे. नंतर त्यात मोहरीची डाळ टाकावी. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालावी. व तिखट मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे. व कारल्याच्या फोडी त्यात टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.
एका बरणीत हे लोणचे भरून ठेवावे.
5-6दिवस हे लोणचे हाताने किंवा चमचाने हालवून घ्यावे. म्हणजे ते खराब होणार नाही.
कारल्याचे लोणचे नक्की करून बघा. व ही झटपट बनणारी रेसिपी कशी वाटली ते कळवा.
टिप: आवडीनुसार तुम्ही तिखट व मीठ कमी जास्त वापरू शकता.
मोहरीची डाळ मिक्सर मधून बारीक करून घेतली तरी चालेल.
1चमचा लिंबू रस घालू शकता. तुमच्या आवडीनुसार.
मुगडाळ चकली रेसिपी पाहण्यासाठी.
https://aayubhagwat.blogspot.com/2021/05/chakalirecipe-in-marathi.html
Pls subscribe zatpat recipes marathi
झटपट रेसिपी मराठी subscribe करा.
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you