चटपटीत कुरडईची भाजी (kurdaichi bhaji)recipe in marathi
गृहिणीसाठी टेन्शन विषय बनला आहे.भाज्या मिळत नाहीयेत.
त्यामुळे आज आपण घरच्या पदार्थांचा वापर करून चटपटीत कुरडईची भाजी झटपट कशी बनवायची ते बघूया.
कृती:
2कुरडई,
1मोठा कांदा बारीक चिरून,
1टोमॅटो बारीक चिरून,
आलं लसूण पेस्ट,
1/2 जिरे पावडर,
1/2 चमचा मोहरी,
चवीनुसार मीठ व तिखट,
1/2 चमचा प्रविण मसाला,
2चमचे तेल.
साहित्य:
कुरडई बारीक करून घ्यावी. कांदा बारीक चिरून घ्यावा.
टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यावे. व बारीक चिरून घ्यावे.
आता एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घालून नीट तडकून घ्यावी. त्या नंतर जिरे तडकून घ्यावेत.
आता कांदा व आलं लसूण पेस्ट घालून ब्राऊन रंगावर परतुन घ्यावा. यात टोमॅटो घालून 2मिनिटे नरम होईपर्यंत परतून घ्यावे.
या मिश्रणात लाल तिखट, प्रविण मसाला व मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे व 2-3 मिनिटे परतत रहावे.
आता यात 1कप पाणी घालून त्यात बारीक केलेली कुरडई घालावी.
पाणी आटे पर्यत शिजवून घ्यावे.नंतर कोथींबीर घालावी आणि भाजी 2-3मिनिटे फ्राय करून घ्यावी.
गरमागरम कुरडईची भाजी पोळी सोबत सर्व्ह करावे.
टिप: कुरडई ज्वारीची वापरावी. नसेल तर गव्हाची चालेल.
यात हिरवे वटाणे टाकल्यास भाजी आणखी चवदार होते.
Pls subscribe Zatpat recipes marathi
बटरसकाॅच आईस्क्रीमसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2021/05/butter-scotch-icecream-recipe-in-marathi.html
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you