खुसखुशीत मुगडाळ चकली (chakali)recipe in marathi
साहित्य:
100ग्रॅम मुगाची डाळ,
500ग्रॅम मैदा,
1/2वाटी तीळ,
1वाटी कोथिंबीर बारीक चिरून,
250ग्रॅम तेल,
आलं लसूण पेस्ट,
हळद,
चवीनुसार मीठ व तिखट
कृती:
सर्व प्रथम मुगाची डाळ कुकर मध्ये डब्यात पाणी घालून ठेवावी.व त्यावर प्लेट झाकण ठेवावी. त्या प्लेट वर एका कपड्यात मैदा बाधून ठेवावे. कुकरची शिट्टी काढून घ्यावी. 15-20 मिनिटे चांगली शिजवून घ्यावी. शिजवून झाल्यावर चमचाने घोटून घ्यावे.
मैदा काढून हाताने चांगले बारीक करून घ्यावे.तुम्ही मिक्सरच्या साहाय्याने देखील मैदा बारीक करून घेऊ शकता.
त्या नंतर मैदा चाळणीने गाळून घ्यावा. आता एका ताटात मैदा घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ व तिखट,हळद घालून घ्यावे.
या मिश्रणात स्वच्छ केलेले तीळ तसेच आलं लसूण पेस्ट घालावी. व कोथींबीर घालून नीट मिक्स करून घ्यावे.
आता या मिश्रणात शिजवून घेतलेली मुगाची डाळ थोडी थोडी घालून त्याची कणीक मळून घ्यावी.
पाणी वापरू नये. डाळीतच कणीक मळून घ्यावी. खुपच गरज वाटल्यास थोडे पाणी घालून कणीक मळून घ्यावी.
आता एका कढईत तेल गरम करत ठेवावे.
चकली बनवण्यासाठी वापरल्या जाणारा साचात वापरा. साचात कणीक भरावी. व त्याच्या मदतीने पेपर वर चकली बनवून घ्याव्यात.
आता गरम तेलात मध्यम आचेवर चकली ब्राऊन रंगावर तळून घ्यावी.
अशा प्रकारे आपली झटपट खुसखुशीत मैदयाची व मुगडाळीची चकली तयार आहे.
चवीला अतिशय छान व झटपट तयार होणारी आहे. तेव्हा नक्की करून बघा.
खुसखुशीत मुगाची डाळ चकली (chakali)recipe |
कुरडईची भाजी रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2021/05/kurdaichi-bhajirecipe-in-marathi.html
Pls subscribe zatpat recipes marathi
झटपट रेसिपी मराठी subscribe करा.
टिप: मुगाची डाळ पिवळी वापरावी.
यात ओवा टाकल्यास अजून छान चव येते.
मैदा बांधून घेण्यासाठी सुती कपडा वापरावा.
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you