गव्हाच्या पीठाचे व्हेजीटेबल कटलेट (gavhache vegetable cutlet) recipe in marathi

Gavhachya pitache cattles recipe in marathi
Vegetable cutlet (व्हेजीटेबल कटलेट)recipe

नेहमी आपण मैदा घालून व्हेज कटलेट बनवतो.परंतु आज आपण गव्हाचे पीठ वापरून कटलेट कसे बनवायचे ते बघूया. हे कटलेट चवीला अतिशय छान लागते. व पौष्टिक देखील आहे.

साहित्य:
1उकडलेला बटाटा, 
2बारीक कट केलेले गाजर,
1/2कप बारीक चिरलेली कोबी, 
थोडेशे हिरवे वटाणे, 
कोथिंबीर,
 1वाटी गव्हाचे पीठ,
 आलं लसूण पेस्ट,
चवीनुसार मीठ व तिखट,
 तळण्यासाठी तेल. 

कृती :
अगोदर एका ताटात उकडून घेतलेला बटाटा कुस्करून घ्यावा.
त्यात गव्हाचे पीठ घालून घ्यावे. यात बारीक चिरलेली कोबी, हिरवे वटाणे, कोथींबीर, बारीक केलेला गाजर घालावा.
या मिश्रणात आलं लसूण पेस्ट घालावी. व चवीनुसार मीठ व तिखट घालून हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. 
यात थोडे पाणी घालून कणीक मळून घ्यावी व हाताला थोडे तेल लावून गोल किंवा तुम्हाला आवडतील त्या आकारात कटलेट बनवून घ्यावेत. 
एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात गव्हाचे व्हेज कटलेट ब्राऊन रंगावर तळून घ्या. 
गरमागरम कटलेट झटपट सर्व्ह करावेत.

मैसूर पाक रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2021/03/masur-pakrecipe-in-marathi.html


Pls subscribe zatpat recipes marathi

aayubhagwat.blogspot.com

टिप:व्हेजीटेबल तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 

Comments

Popular Posts