मायेची ममता
नेहा ही दिसायला सुंदर व हुशार मुलगी असते. तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ती काॅलेजला जाते. तिथे तिची मैञी सुनीलशी होते. सुनील हा अभ्यासात हुशार व देखणा असतो. नेहा व सुनील हे एकञ अभ्यास करतात.नेहमी सोबत राहतात.या सगळ्यात ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. या सगळ्यात त्याच्या अभ्यासात कोणताही परिणाम होत नाही. ते दोघे ही मनापासून अभ्यास करतात. व कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला चांगले मार्क घेऊन पास होतात. दोघेही एकमेकांना जीवापाड प्रेम करत असतात. दोघांना ही चांगली नोकरी मिळते. दोघेही कामात व्यस्त होतात.पण त्याच्या प्रेमात कामाचा थोडासा ही परीणाम होत नाही. उलट त्याचे प्रेम अधिकाधिक घट्ट होत जाते.
नेहा व सुनील हे त्याच्या प्रेमाविषयी घरी सांगायच ठरवतात.घरी सांगितल्या नंतर दोघांच्या ही घरचे या सगळ्याला लवकर तयार होत नाही. पण दोघांना भेटल्या नंतर लग्नाला होकार देतात.दोघेही खुप खुश होतात.लग्नाची तारीख ठरते.तयारी सुरू होते. व खुप थाटामाटात लग्न सोहळा पार पडतो. लग्नानंतर चे दिवस छान सुरू होतात. नेहा ही सुनीलच्या घरात रमून जाते.नोकरी व घर याचा ताळमेळ तिला छान जमायला लागतो.
दोघेही फार खुश असतात. लग्नाला 7-8महीने होतात.अशातच बाळाची चाहुल लागते. व दोघेही खुप खुश असतात. घरात सगळे आनंदात असतात. सगळीकडे आनंदोत्सव साजरा केल्या सारखे वातावरण निर्माण झालेले असते. नेहाची सासू तिला काय हवं नको ते बघते.तिची फार काळजी घेते.7महिना लागतो. आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवतात.कार्यक्रम छान सुरू असतो.नेहाची जाऊ दोन वाट्या घेऊन येते.एकात पेढे व एकात जिलेबी ठेवलेली असते. नेहाला थोडे टेन्शन येते. नेहा कोणती वाटी उचलते याकडे सगळ्याचे लक्ष लागते.सुनील पटकन समोर येतो व एक वाटी उचलतो. त्यात बर्फी होती हे बघून सगळे हसतात. त्याची बहीण येऊन परत वाटी बदलते.नंतर नेहा पेढयाची वाटी उचलते व सगळे आनंदी होतात.
अगदी आनंदाने 9महीने जातात. नेहाला ञास होतो. त्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन जातात. तेथे ती एका गोडस बाळाला जन्म देते. सगळे आनंदी होतात. नेहा व सुनीलचा आनंद गगनात मावेनासा झाला. नेहा सोबतच तेथे आणखी एक डिलेवरी होते. ती बाई एका गोडस मुलीला जन्म देते. पण त्या बाळाला एकटीला सोडून ती या जगाचा निरोप घेते.ती मुलगी असते या कारणाने तिला दवाखान्यात सोडून सगळे निघून जातात. हे सगळे बघून नेहा व सुनील फार वाईट वाटते. ते दोघे ही मिळून एक निर्णय घेतात.त्या लहान मुलीला आपली मुलगी बनवण्याचा.घरचे या निर्णयाला विरोध करतात पण दोघांच्या हट्टासमोर त्याचे काहीच चालत नाही. सुनील त्या मुलीला दत्तक घेण्याची सगळी कागदपत्रे तयार करतो.व तिला मुलगी बनवून घरी घेऊन जातो.काही दिवसांनी घरचे देखील आपल्याला एक नातू व एक नात झाली या आनंदात असतात.
Pls subscribe zatpat recipes marathi
(झटपट रेसिपी मराठी)
aayubhagwat.blogspot.com
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you