मैसूरपाक (masore pak)recipe in marathi

मैसुरपाक रेसिपी
Masore pak recipe in marathi

साहित्य:
3वाट्या बेसन पीठ, 
3वाट्या साखर, 
2वाट्या डालडा,
 1वाटी पाणी, 
1/2चमचा बेकिंग पावडर/खाण्याचा सोडा 

कृती:
सर्व प्रथम एका पॅन मध्ये 3वाट्या साखर व 1वाटी पाणी घालून एकतारी पाक बनवून घ्यावा. 
त्या नंतर डालडा गरम करत ठेवावा .चांगले गरम झाले कि गॅस मंद आचेवर ठेवावा.
डालडा ऐवजी तुम्ही चांगले तूप किंवा 1वाटी तूप व एक वाटी तेल असे देखील वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार वापरा.परंतु एक लक्षात ठेवा जे वापरला ते गरम हवे.
आता साखरेच्या पाकात गॅस मध्यम आचेवर ठेवून थोडे थोडे बेसन पीठ घालून त्याला हलवत रहावे. 
असे करून पाकात सर्व पीठ मिक्स करून घ्यावे व बेकिंग पावडर घालावी. गरम डालडा 1चमचा करून त्यात टाकून हलवत रहावे. 
अशा प्रकारे सर्व डालडा टाकून नीट मिक्स करून घ्यावे.मैसूर पाकाला छान जाळी येताना दिसेल.2-3मिनिटे हलवून एका चौकोनी आकाराच्या भांड्यात तूपाचा हात लावून  काढून घ्यावे. 
व 10मिनिटे झाली की वडा पाडावयात 15-20 मिनिटे तसेच ठेवून नंतर मैसूरपाक काढून घ्यावा. 
अशा प्रकारे आपली झटपट मैसुर पाक रेसिपी तयार आहे. 


Pls subscribe zatpat recipes marathi


टिप:
शेजवान राईस रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2021/01/schezwan-rice-recipe-in-marathi.html

Comments

Popular Posts