Schezwan rice(शेजवान राइस) recipe in marathi

साहित्य:
2वाट्या बासमती तांदूळ,
1टोमॅटो,
 2शिमला मिरची,
 2वाट्या बारीक चिरून पत्ता कोबी,
 1/2वाटी वटाणे,
 2हिरव्या मिरच्या,
 आलं लसूण पेस्ट 1चमचा, 
1मोठा कांदा, 
1/2वाटी बारीक चिरून कांदयाची पात,
1/2वाटी गाजराचे काप,
Schezwan rice recipe in marathi
Schezwan rice(शेजवान राइस)recipe in marathi

2चमचे टोमॅटो सॉस, 
2चमचा शेजवान साॅस, 
चवीनुसार मीठ व 2चमचे तेल. 

कृती:
सर्व प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत. व नंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून भात शिजवून घ्यावा. पाणी नेहमीपेक्षा कमी वापरल्यास राईस मोकळा होतो. 
आता सर्व भाज्या धुऊन बारीक चिरून घ्याव्यात. (आडव्या किंवा उभ्या आकारात).
आता एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. व ब्राऊन रंगावर तळून घ्या. त्या नंतर त्यात कांदा घालावा व लाल रंगावर परतून घ्यावा. 
आता त्यात बारीक केलेला कोबी, शिमला मिरची, टोमॅटोचे काप,हिरव्या मिरचीचे काप व वटाणे घालून नीट मिक्स करून घ्यावे.व 4-5मिनिटे मध्यम आचेवर ठेवून नंतर त्यात थोडी कांदयाची पात घालून फ्राय करावे. 
आता या मिश्रणात शिजवून घेतलेला भात मोकळा करून घालावा.
यावर शेजवान साॅस व टोमॅटो सॉस ,चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे.
त्यावर कांदयाची पात घालून फ्राय करावे. 2-3मिनिटे फ्राय करून नंतर 2मिनिटे झाकून ठेवावे. 
अशा प्रकारे आपला झटपट शेजवान राइस तयार आहे. 

टिप:तांदूळ पाण्यात थोडा वेळ भिजवलयास भात मोकळा होतो. 
 
Pls subscribe Zatpat recipes marathi


टिप:
कुरकुरीत कांदाभजी रेसिपीसाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2021/01/kurkurit-kanda-bhaji-recipe-in-marathi.html

Comments

Popular Posts