Kurkurit Kanda bhaji (कुरकुरीत कांदा भजी)recipe in marathi

कुरकुरीत कांदा भजी रेसिपी
Kurkurit kanda bhaji(कुरकुरीत कांदा भजी)recipe


साहित्य:
2वाट्या बेसन पीठ,
 2टेबल स्पून गव्हाचे पीठ,
 2टेबल स्पून तांदुळाचे पीठ, 
1मोठा कांदा,
1/2ओवा, 
1/2चमचा लाल मिरची पावडर, 
थोडीशी हळद, 
आलं लसूण पेस्ट2हिरव्या मिरच्या, 
गरजेनुसार तेेल,
मीठ व आवडीनुसार कोथींबीर,

कृती:
सर्व प्रथम कांदा उभा चिरून घ्यावा. मिरची बारीक चिरून घ्यावी. 
आता एका बाॅउल मध्ये बेसन पीठ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ एकञ करून घ्यावे.
या मिश्रणात लाल तिखट व मीठ चवीनुसार घालून घ्यावे. तसेच बारीक चिरून घेतलेली मिरची, ओवा व खाण्याचा सोडा घालून नीट मिक्स करून घ्यावे.
या मिश्रणात थोडे थोडे पाणी घालून पीठ मिक्स करून घ्यावे .
हे मिश्रण खूप पातळ किंवा खुप घट्ट करू नये. मध्यम ठेवावे. 
हे मिश्रण 10-15 मिनिटे झाकून ठेवावे. 
त्या नंतर यात कांदा व कोथींबीर घालून नीट मिक्स करून घ्यावे.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे. व त्यात हाताने लहान लहान भजी टाकावीत.
कांदा भजी ब्राउन रंगावर तळून घ्यावे व गरमागरम सर्व्ह करावेत. 
अशा प्रकारे तुमची झटपट कुरकुरीत कांदा भजी तयार आहेत.

टिप:यात चिमुटभर खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल. 

Pls subscribe zatpat recipes marathi

टिप:
तीळाची मिरची रेसिपीसाठी ही लिंक नक्की बघा.

https://aayubhagwat.blogspot.com/2020/12/tilatli-mirchirecipe-in-marathi.html
 

Comments

Popular Posts