तीळाची मिरची (tilatli mirchi)recipe in marathi
साहित्य:
1/2वाटी तीळ,
10-12 हिरव्या मिरच्या,
1कप ताक,
1/2जिरे पावडर,
चवीनुसार मीठ व लसूण पेस्ट
कृती:
मिरच्या स्वच्छ धुवून घ्याव्यात.
व चाकूचया किंवा विळीचया सहाय्याने उभ्या चिरून घ्याव्यात.
पॅन गरम करून त्यावर तीळ भाजून घ्यावेत. थंड झाल्यावर तीळाचा जाडसर कुट मिक्सरमधून काढून घ्यावा.
आता एका पातेल्यात चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, गरजेनुसार पाणी व ताक घालावे.
हे मिश्रण गॅसवर ठेवावे. त्या नंतर त्यात लसूण पेस्ट,मीठ व तीळाचा कुट(आवडत असल्यास वरून 1/2चमचा तेल घातले तरी चालेल) घालून मिरच्या चांगल्या शिजवून घ्याव्यात.
पुर्ण पाणी आटले की गॅस बंद करावा.
अशा प्रकारे आपली झटपट बनणारी तीळातील मिरची तयार आहे.
Pls subscribe Zatpat recipes marathi
टिप:
ताक नसेल तर 2चमचे लिंबाचा रस देखील वापरू शकता.
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you