पौष्टिक थालीपीठ (postik thalipith)recipe in marathi

पौष्टिक थालीपीठ
पौष्टिक थालीपीठ (postik thalipith)recipe
आजची रेसिपी चवीला अतिशय छान व झटपट तयार होणारी आहे. 

साहित्य:
1/2वाटी गव्हाचे पीठ, 
1वाटी ज्वारीचे पीठ, 
1वाटी बेसन पीठ,
 2मोठे कांदे, 
आलं लसूण पेस्ट, 
1लहान वाटी कोथींबीर बारीक चिरून,
1/2वाटी पालक बारीक चिरून,
 1बारीक चिरलेला टोमॅटो,
 1चमचा जिरे पावडर
, चवीनुसार मीठ व तिखट, 
थालीपीठ भाजण्यासाठी तेल 

कृती:

1)एका ताटात गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ तसेच बेसन पीठ एकञ करून घ्यावे.
2)कांदा, टोमॅटो, कोथींबीर व पालक बारीक चिरून घ्यावेत. 
3)बारीक चिरून घेतलेल्या भाज्या पीठात मिक्स करून घ्याव्यात. 
4)या मिश्रणात आलं लसूण पेस्ट घालावी. व लाल तिखट व मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे .व कणीक मळून घ्यावी.
5)एक जाड बुडाचे पातेले घ्यावे.  त्यात मळून घेतलेल्या कणकेचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून पातेलयाचया तळाशी गोळा ठेवून तळहाताला पाणी लावून थालीपीठ थापून घ्यावे. व थालीपीठच्या मध्ये व बाजूने होल करून त्यात थोडे थोडे तेल सोडावे. व कडेने थोडे तेल सोडून वरून झाकण ठेवावे. 
6)मध्यम आचेवर थालीपीठ लालसर रंगावर भाजून घ्यावे. 
7)गरमागरम थालीपीठ चटणी, लोणचे किंवा साॅस सोबत सर्व्ह करावे.
  


Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 



टिप:आवला कॅडी रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 

https://aayubhagwat.blogspot.com/2020/11/amla-candy-recipe-in-marathi.html

Comments

Popular Posts