Veg manchurian(झटपट व्हेज मंचूरियन)recipe)in marathi
चायनीज फूड हे सगळ्यानाच आवडत. नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटते. चला तर मग वेळ न लावता, आज आपण झटपट घरीच बनवूयात व्हेज मंचूरियन रेसिपी.
Veg manchurian recipe |
साहित्य: 1कप बारीक चिरलेली पत्ता कोबी,
1कप बारीक चिरलेली शिमला मिरची,
1/2कप भिजवलेला भात,
1कांदा बारीक चिरून(1उभा चिरलेला कांदा),
लसूण-अद्रक पेस्ट,
1चमचा मिरे पावडर,
1/2कप मैदा,
2चमचे मका पीठ,
2चमचे सोया साॅस,
2चमचे रेड चिली सॉस,
1चमचा टोमॅटो सॉस,
चवीनुसार मीठ व तिखट,
1/2साखर,
तळण्यासाठी तेल
कृती:
एका बाॅउल मध्ये बारीक चिरून घेतलेली पत्ता कोबी, कांदा, शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा थोडीशी आलं लसूण पेस्ट, मिरे पावडर, थोडे मीठ व तिखट घालून हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. व त्यात मैदा तसेच शिजवून घेतलेला भात थोडासा कुस्करून घालावा.या मिश्रणात 1चमचा सोया साॅस, 1चमचा रेड साॅस घालून याला मिक्स करून त्याची कणीक मळून घ्यावी.
आता एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात उभा चिरून घेतलेला कांदा 2मिनिटे फ्राय करावे. नंतर त्यात शिमला मिरचीचे काप घालून 1मिनिटे फ्राय करावे. नंतर आलं लसूण पेस्ट घालावी. तसेच मिरे पावडर व मीठ घालून 1मिनिटे फ्राय करून घ्यावे. व त्यात सोया साॅस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस घालावा.
आता मका पिठामधे थोडे पाणी घालून ते या मिश्रणात मिक्स करून घ्यावे. व फ्राय केलेले मंचूरियन बाॅल घालून नीट मिक्स करून घ्यावे. व 2-3मिनिटे फ्राय करावे. व गरमागरम व्हेज मंचूरियन सर्व्ह करावेत.
टिप: तुमच्या आवडीनुसार आणखी भाज्या तुम्ही वापरू शकता.
मैदा सोबत थोडे मका पीठ घातले तर मंचूरियन जास्त छान होईल.
Zatpat recipes marathi नक्की subscribe करा.
टिप:सोया मंचूरियन रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/10/soya-manchurianrecipe-in-marathi.html
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you