उपवासाची पुरी भाजी( upavasacha puri bhaji)recipe in marathi

उपवासाची पुरी भाजी रेसिपी
उपवासाची पुरी भाजी (upavasachi puri bhaji)recipe

उपवास असला कि तिच ती साबुदाणा खिचडी खायचा कंटाळा येतो. अशा वेळी जर आपण उपवासाची पुरी भाजी झटपट तयार केली. तर काही तरी वेगळी रेसिपी खायला मिळेल.चला तर मग आज आपण बनवूया उपवासाची पुरी भाजी. 

साहित्य:
1वाटी भगरीचे पीठ, 
1बटाटयाचे काप,
3चमचे शेंगदाणे कुट,
  अद्रक पेस्ट, 
चवीनुसार मीठ व हिरव्या मिरचीची पेस्ट, 
तळण्यासाठी तेल किंवा तूप 

कृती:
एका ताटात भगरीचे पीठ घेऊन त्यात थोडे मीठ घालून घ्यावे. थोडे थोडे पाणी घालून कणीक मळून घ्यावी. 
एका कढईत तेल गरम करत ठेवावे.
कणकेचे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करावेत. व पोळपाटावर पुरया लाटून घ्याव्यात. 
तेल गरम झाले कि त्यात मध्यम आचेवर पुरया लाल रंगावर तळून घ्याव्यात. 
एका कढईत तेल गरम करत ठेवावे. व त्यात अद्रकची पेस्ट घालावी.तसेच हिरव्या मिरचीची पेस्ट व मीठ घालावे. तसेच शेंगदाणे कुट व खोबरयाचया कुट घालून 2मिनिटे फ्राय करावे. 
नंतर त्यात बटाटयाचे काप घालून मिक्स करून घ्यावे. व त्यात गरजेनुसार पाणी घालून भाजी बनवून घ्यावी. 
गरमागरम पुरी भाजी सर्व्ह करावी.


टिप: 
भगरीची कणीक मळून घेताने गरम पाणी वापरावे.किंवा पिठाची उकड घ्यावी. 




Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 


टिप:उपवासाचा डोसा रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/10/1-12-3-4.html

Comments

Popular Posts