सोया मंचूरियन (soya manchurian)recipe in marathi

सोया मंचूरीयन रेसिपी
Soya manchurian recipe
मंचूरियन हे जवळ पास सगळ्यानाच आवडते. आज आपण घरच्या घरीच झटपट सोया मंचूरियन कसे बनवायचे ते बघूया. 

साहित्य:
2कप सोयाबीन वडा,
 1टोमॅटो, 
1शिमला मिरची,
 1कांदा, 
2चमचे टोमॅटो सॉस,
2चमचे सोया साॅस,
1चमचा रेड चिली सॉस ,
 आलं लसूण पेस्ट,
3चमचे मैदा, 
2चमचे दही,
2चमचे साखर, 
 तिखट व मीठ चवीनुसार 

कृती:
सर्व प्रथम सोयाबीन वडा गरम पाण्यात उकळून घ्या. त्या नंतर तो 5-10मिनिटे तसाच ठेवावा.
आता वडा एका चाळणीत घेऊन चमचाने त्यातील पाणी काढून घ्यावे. त्या नंतर  सोयाबीन वडा एका बाॅउल मध्ये घेऊन त्यात थोडे से  तिखट व मीठ ,आलं लसूण पेस्ट  घालून, तसेच दही व मैदा घालून नीट मिक्स करून घ्यावे.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे. व त्यात मध्यम आचेवर वडे लाल सर्व्ह रंगावर तळून घ्यावे . शिमला मिरची, टोमॅटो, कांदा याचे उभे काप करून  घ्यावेत. 
एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात कांदा, शिमला मिरची व टोमॅटो चे काप घालून फुल गॅसवर 2मिनिटे फ्राय करावे. त्यानंतर त्यात तळून घेतलेला सोयाबीन वडा घालावा. व त्या सोबतच सोया साॅस, टोमॅटो सॉस व रेड चिली सॉस व साखर घालून नीट मिक्स करून घ्यावे. व 2मिनिटे फ्राय करावे. 
अशा प्रकारे सोया मंचूरियन रेसिपी तयार आहे.



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 


टिप:व्हेज मंचूरियन रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/10/veg-manchurian-recipein-marathi.html

Comments

Popular Posts