उपवासाचा डोसा (upavasacha dosa)recipe in marathi

साहित्य:
 1वाटी भगर, 
1/2वाटी साबुदाणा, 
1मोठा बटाटा,  
3-4हिरव्या  मिरच्या ,
चवीनुसार मीठ व उपवासाचे तेल(शेंगदाणे तेल)
                                                                    
Upavasacha dosa recipe in marathi
उपवासाचा डोसा (Upavasacha dosa)recipe 


कृती: 
राञभर भगर व साबुदाणा वेगळे वेगळे भिजवून ठेवावा.भिजवलेल्या साबुदाणा व भगर सकाळी मिक्सर मधून बारीक करावे. 
या मिश्रणात मीठ घालून हे मिश्रण फुलण्यासाठी 4-5तास ठेवावे. 
नंतर पॅनला गरम करून त्याला तेल लावून त्यावर हे मिश्रण चमचा च्या सहाय्याने पसरून घ्यावे. व डोसा च्या सगळ्या बाजूने तेल सोडावे. डोसा छान ब्राऊन रंगावर भाजून घ्यावा. 

बटाटा उकडून त्याचे बारीक काप करावेत. व कढईत तेल गरम करत ठेवावे .व त्यात अद्रक तसेच हिरव्या मिरचीची पेस्ट व मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे. व बटाटयाचे काप घालून 3-4मिनिटे फ्राय करावे. 
ही भाजी डोसा वर घालून त्याचा रोल बनवून घ्यावा व गरमागरम सर्व्ह करावेत. 
अशा प्रकारे आपला उपवासाचा डोसा झटपट तयार आहे.



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

टिप:उपवासाची पुरी भाजी रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/10/upavasacha-puri-bhajirecipe-in-marathi.html

Comments

Popular Posts