वांगी मसाला फ्राय (vangi masala fry )recipe in marathi

 साहित्य:
10-12लहान वांगी, 
1मध्यम आकाराचा कांदा,
4लहान चमचे शेंगदाणे कूट, 
गरम मसाला (दगडी फुल पावडर -1चमचे, धने पावडर-2चमचे, मिरे -लवंग पावडर-1/2चमचा,जिरे पावडर-1चमचा ),
खोबरे कूट-1चमचा, 
आलं लसूण पेस्ट, 
चवीनुसार मीठ व तिखट, 
तळण्यासाठी तेल. 
                                                                         
वांगी मसाला फ्राय रेसिपी
वांगी मसाला फ्राय रेसिपी 



कृती:
सर्व प्रथम मसाला वांगी बनवण्यासाठी वांग्याची काप(फोडी करू नये शाबीत ठेवावी) करून घ्यावेत.कांदा बारीक चिरून घ्यावा. व ब्राऊन रंगावर भाजून घ्यावा. त्याची मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी. 

आता एका बाॅउल मध्ये सर्व मसाला पावडर तसेच, कांदा पेस्ट, आलं लसूण पेस्ट, शेंगदाणे व खोबरे कूट, तिखट- मीठ एकञ करून त्यात एक चमचा पाणी घालून नीट मिक्स करून घ्यावे.
वांग्यात गरम मसाला भरून घ्यावा. 

आता एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात तेल चांगले गरम झाले. कि वांगी मध्यम आचेवर तळून घ्यावीत. तळून उरलेले तेल काढून घ्यावे.व थोडेसे तेल पॅन मध्ये टाकून उरलेला मसाला व वांगी घालून 5मिनिटे मध्यम आचेवर ठेवून फ्राय करावे. नंतर गरमागरम वांगी मसाला पोळी सोबत सर्व्ह करावेत. 
अशा प्रकारे आपले अगदी कमी वेळात झटपट असे वांगी मसाला फ्राय तयार आहेत.



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 



टिप:चवदार रगडा रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/08/chavdar-ragdarecipe-in-marathi.html

Comments

Popular Posts