तवा पिझ्झा (tava pizza)recipe in marathi

पिझ्झा बेस साहित्य:
2कप मैदा, 
1/2कप दही, 
1/2चमचा खाण्याचा सोडा, 
1/2चमचा बेकिंग पावडर,
 1चमचा तेल,
चवीनुसार मीठ,
पाणी .
                                                                                 
तवा पिझ्झा रेसिपी
तवा पिझ्झा रेसिपी 


पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य:
चिझ किसून,
 शिमला मिरचीचे काप(हिरवी व लाल शिमला मिरची ),
तेल

कृती:
एका बाॅउल मध्ये चाळून घेतलेला मैदा घ्यावा.
 त्यात दही तसेच बेकिंग पावडर, सोडा व मीठ व एक चमचा घालून नीट मिक्स करून घ्यावे.
त्यात पाणी घालून कणीक पोळीला मळतो त्याप्रमाणे स्टफीग करून घ्यावी.
हाताला चिटकत असेल तर थोडे तेल लावून 10-15 मिनिटे एक सारखे मळून घ्यावे. व गोळा बनवावा.
आता एका बाॅउल मध्ये हा गोळा तासभर किंवा 6-7तास झाकून ठेवावा.
पापड भाजणयासाठी जी जाळी वापरतो ती घ्यावी. बाॅउल मध्ये ठेवल्या गोळ्यातून एक भाग काढून घ्यावा. व तो एक सारखा करून घ्यावा.
आता ते पोळपाटावर एकसारखे लाटून जाळीत ठेवून द्यावे.व बाजूने नीट पसरून घ्यावे. 
10-15 मिनिटे हे एका कापडाने झाकून ठेवावे. 
त्यानंतर चमचाने सगळीकडून थोडे थोडे पोचे मारून घ्यावेत. व थोडे तेल टाकून सगळीकडे पसरून घ्यावे. 
आता त्यावर पिझ्झा साॅस घालून पिझ्झा बेस वर पसरून घ्यावा.त्यावर चिझ टाकावे.नंतर शिमला मिरचीचे काप घालून घ्यावेत.
आता पोळ्या बनवतो त्या पॅन वर ही जाळी ठेवावी.त्यावर कुकरचे झाकण शिट्टी व रिंग काढून 15-20मिनिटे एकदम कमी गॅसवर ठेवावे.नंतर गॅस बंद करावा. व जाळी 10 मिनिटे तशीच ठेवावी. 10मिनिटांनी पिझ्झा अलगद काढून सर्व्ह करावा. 
अशा प्रकारे आपला झटपट तवा पिझ्झा रेडी आहे. 



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 


टिप:पिझ्झा साॅस रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/08/pizza-sauce-recipe-in-marathi.html

Comments

Popular Posts