तांदुळाची खीर (tandlachi kheer)recipe in marathi

आज आपण तांदूळाची खीर झटपट कशी बनवायची ते बघूया. 

साहित्य:
250ग्रॅम दुध, 
8-9लहान चमचे तांदूळ,
साखर 1मध्यम आकाराची वाटी,
1चमचा विलायची पावडर, 
काजू,पिस्ता, 
बदामचे काप आवडीनुसार, 
2चमचे तुप

कृती:
तांदूळ धुवून पाण्यात 1-2तास भिजवून ठेवावा.भिजवलेला तांदूळ मिक्सर मधून बारीक करावे. 
दुध गरम करून घ्यावे. 
आता एका पातेल्यात तूप घालून थोडे गरम झाले. कि त्यात मिक्सर मधून बारीक केलेला, तांदूळ घालून 1मिनिटे फ्राय करून घ्यावे.
आता त्यात दुध घालून मिश्रण हलवावे.यात विलायची पावडर व साखर घालून नीट मिक्स करून घ्यावे. 
3-4मिनिटे मिनिटे ही खीर उकळून घ्यावी. नंतर त्यात काजू बदाम व पिस्ताचे काप घालून गॅस बंद करावा. 
थंड झाल्यावर सर्व्ह करावी.
टिप:घरी केशर असल्यास ते घातल्याने रंग व चव दोन्ही छान येते.
साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो.
Recipe in marathi

तांदुळाची खीर (tandlachi kheer)recipe



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 


टिप:गुलाब जामुन रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/07/gulab-jamunrecipe-in-marathi.html

Comments

Popular Posts