पिझ्झा साॅस (pizza sauce )recipe in marathi
- साहित्य:
- 1 वाटी टोमॅटो साॅस,
- 2चमचे बटर किंवा तूप,
- 1चमचा जिरे पावडर,
- 1चमचा धने पावडर ,
- 1/2चमचा मिरे पावडर,
- 5-6लसूण पाकळ्याचे बारीक काप,
- 1चमचा चिली फ्लेकस,
- 1चमचा साखर,
- (असल्यास 1/2चमचा शेंदून मीठ ),चवीनुसार मीठ
- कृती:सर्व प्रथम एका पॅन वर बटर किंवा तूप टाकून त्यात लसणाचे बारीक काप परतून घ्यावे. परंतु हे काप ब्राऊन होऊ देऊ नयेत.
- आता एका बाॅउल मध्ये टोमॅटो साॅस घेऊन त्यात जिरे पावडर, मिरे पावडर, धने पावडर, चिली फ्लेकस शेंदे मीठ, साखर, तसेच मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे.
- या मिश्रणात बटर घालून फ्राय केलेला लसूण मिक्स करून घ्यावा. अशा प्रकारे पिझ्झा साॅस तयार आहे.
- टिप:टोमॅटो सॉस नसेल तर 2टोमॅटो पाण्यात उकळून त्याची सालं काढून घ्यावी व मिक्सर मधून काढून घ्यावे. त्यात थोडेसे तिखट व मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे.
- अशा प्रकारे आपला झटपट पिझ्झा साॅस तयार आहे. नक्की करून पहा.
Zatpat recipes marathi नक्की subscribe करा.
- टिप:तवा पिझ्झा रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा.
- https://aayubhagwat.blogspot.com/2020/08/tava-pizzarecipe-in-marathi.html
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you