चवदार रगडा(chavdar ragda)recipe in marathi



रगडा लहानापासून मोठ्या पर्यत सगळ्यानाच आवडतो. आज आपण पोळी पासून झटपट व चवदार रगडा कसा बनवायचा ते बघूयात.

साहित्य:
2पोळ्या,
 1मोठा कांदा, 
1वाटी हिरवे वटाणे,
1टोमॅटो,
1बटाटा, 
आलं लसूण पेस्ट, 
जिरे पूड, 
1/2वाटी बारीक शेव,
 कोथींबीर, 
चवीनुसार मीठ व तिखट,
 तळण्यासाठी तेल
                                                                            
चवदार रगडा रेसिपी
चवदार रगडा (ragda)recipe in marathi 


कृती:
पोळ्याचे तुकडे करून ते चांगले खरपूस तळून घ्यावेत. 
कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. बटाटा उकडून त्याचे बारीक काप करावेत. 
वटाणे मिक्सर मधून बारीक करावे. 
एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरे पावडर घालावी. नंतर आलं लसूण पेस्ट घालावी. व तिखट घालून 1मिनिटे फ्राय करून घ्यावे. 
आता यात बारीक केलेले वटाणे घालून 3-4मिनिटे फ्राय करावे. नंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून उकळून घ्यावे. हे मिश्रण पातळच ठेवावे. 
आता एका डिश मध्ये तळून घेतलेले पोळयाचे तुकडे, बारीक केलेला कांदा, टोमॅटो घालावे. त्यात तयार रगडा,दही  व बटाटयाचे काप घालून वरून कोथिंबीर व शेव पेरावी. व गरमागरम सर्व्ह करावे.
टिप:वटाणे नसतील तर तुम्ही भिजवलेले हरभरे देखील वापरू शकता. मी वापरते तुम्ही पण वापरून बघा,छान चव येते.


Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

टिप:वांगी मसाला फ्राय रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/09/gangi-masala-fry-recipe-in-marathi.html

Comments

Post a Comment

तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you

Popular Posts