ब्रेड पकोडा (bread pakoda)recipe in marathi

Recipe in marathi
ब्रेड पकोडा (bread pakoda)recipe

साहित्य:
8ब्रेड,
3-4बटाटे,
1कांदा, 
आलं लसूण पेस्ट,
जिरे, 
मोहरी, 
4लहान चमचे बेसन पीठ, 
चवीनुसार मीठ व तिखट, 
तळण्यासाठी तेल

कृती:
सर्व प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. व उकडून घेतलेले बटाटे कुस्करून घ्यावेत. 
एका पॅन मध्ये तेल गरम करा.त्यात मोहरी व जिरे घालून तडकून घ्यावेत. कांदा बारीक चिरून घ्यावा.  पॅन मध्ये फ्राय करून ,त्यात तिखट व मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे.
कुस्करलेला बटाटा त्यात घालून नीट मिक्स करून घ्यावे. व 3-4मिनिटे फ्राय करावे. 
एका बाॅउल मध्ये बेसन पीठ व थोडेसे तिखट व मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे. व पाणी घालून भजे बनवताने पीठ बनवतो. त्या प्रमाणे बनवून घ्यावे .
पीठ जास्त पातळ करू नये.
ब्रेड स्लाईस काढून घ्याव्यात.ब्रेड ञिकोणी आकारात कट करावेत. व ब्रेड बटाट्याची भाजी लावून घ्यावी. व एकाला एक चिटकून घ्यावे. 
एका कढईत तेल गरम करत ठेवावे. व तेल गरम झाले कि ब्रेड बेसन पीठामधये बुडवून तेलामधे ब्राऊन रंगावर तळून घ्यावे .व गरमागरम झटपट बनवलेले ब्रेड पकोडे सर्व्ह करावेत. 


Zatpat recipes marathi नक्की  subscribe करा. 


टिप:दाल खिचडी रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/07/dal-khichadirecipe-in-marathi.html

Comments

Popular Posts