टोमॅटो डोसा (tomato dosa) recipe in marathi

साहित्य:
2वाट्या तांदूळ,
 1/2वाटी उडीद डाळ, 
3-4हिरव्या मिरच्यांची पेस्ट,
 2टोमॅटो ,
आलं लसूण पेस्ट, 
1/2चमचा जिरे पावडर,
 कोथींबीर व मीठ चवीनुसार, 
तेल
                                                              
Marathi recipe
टोमॅटो डोसा (tomato dosa)recipe 

  कृती:
 तांदूळ व डाळ स्वच्छ धुवून घ्यावी.व वेगवेगळी भिजवून ठेवावे. किमान 7-8तास भिजवावे. 
नंतर मिक्सर मधून तांदूळ व डाळ बारीक काढून घ्यावे. 
पाणी जास्त वापरू नये हे मिश्रण इडली पीठपेक्षा थोडे सेल असेल तरीही चालेल.
हे मिश्रण एका डब्यात टाकून त्यात मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे. व 6-7तास फुलण्यासाठी ठेवून द्यावे.
आता टोमॅटो किसून घ्यावे. व टोमॅटोचा किस,आलं लसूण पेस्ट ,हिरव्या मिरचीची पेस्ट, जिरे पावडर, कोथींबीर, चवीनुसार मीठ घालुन हे मिश्रण नीट मिक्स करून घ्यावे.
एका पॅनला तेल लावून पॅन गरम करून त्यावर हे मिश्रण चमचाच्या साहाय्याने टाकून, चमचाने त्याला पॅन वर गोलाकारात फिरवून डोसाचा आकार दयावा. व बाजूने तेल सोडावे. 
टोमॅटो डोसा छान ब्राऊन रंगावर भाजून घ्यावा. 

गरमागरम झटपट टोमॅटो डोसा नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करावा.

Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

  टिप:पोहे झटपट रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/07/poha-zatpat-recipein-marathi.html

Comments

Popular Posts