पनीर मसाला ( paneer masala)recipe in marathi
200ग्रॅम पनीरचे पिस,
1मोठे टोमॅटो,
1कांदा,
पनीर मसाला 3चमचे,
चवीनुसार मीठ व तिखट,
आलं लसूण पेस्ट,
कोथींबीर,
1कप दुध,
तेल
कृती:
पनीरचे पिस बनवून घ्यावे. व एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात शालो फ्राय करावे.
कांदा व टोमॅटो मिक्सर मधून बारीक करावे.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे. व त्यात जीरे तडकून घ्यावेत.
नंतर त्यात लसूण व आलं लसूण पेस्ट घालावी.
त्या नंतर मिक्सर मधून बारीक केलेला कांदा व टोमॅटोची पेस्ट घालावी.
तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.नंतर पनीर मसाला दुधात मिक्स करून फ्राय करावे. व लाल तिखट व मीठ घालून चांगले परतून घ्यावे.
आता फ्राय केलेले पनीरचे पीस घालून 2मिनिटे फ्राय करावे. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळून घ्यावे. व कोथींबीर घालावी.
गरमागरम पनीर मसाला पोळी सोबत सर्व्ह करावे.
अशा प्रकारे झटपट पनीर मसाला रेसिपी तयार आहे.
टिप:टोमॅटो डोसा रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/07/tomato-dosa-recipe-in-marathi.html
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you