दम आलू( dam aalu)recipe in marathi


आज आपण झटपट बनणारी दम आलू रेसिपी बनवणार आहोत. 
साहित्य:
250ग्रॅम लहान आकाराचे बटाटे, 
1मध्यम आकाराचा कांदा, 
जिरे, 1/2मिरे पावडर, 
1/2चमचा शहाजिरा पावडर, 
4-5लवंगाची बारीक पूड,
2कप दही, 
आलं लसूण पेस्ट,
चवीनुसार मीठ व तिखट, 
तेल,
कोथींबीर

कृती:
एका पातेल्यात पाणी घालून त्यात बटाटे उकडून घ्यावेत. 
बटाट्याची सालं काढून घ्यावी. 
एका कढईत तेल गरम करत ठेवावे व त्यात बटाटे चांगले तळून घ्यावेत. 
नंतर तळण्यासाठी घेतलेले तेल कमी करून त्यात जिरे तडकून घ्यावेत. 
नंतर कांदा घालून गुलाबी रंगावर परतुन घ्यावा व आलं लसूण पेस्ट घालावी.
नंतर लाल तिखट व मीठ घालून त्यात शहाजिरा पावडर, लवंग पावडर, मिरे पावडर घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर दही 2घालून 2मिनिटे फ्राय करावे. 
आता त्यात बटाटे घालून थोडेसे पाणी घालावे. व चांगले उकळून घ्यावे. 
वरून कोथिंबीर घालावी व गरमागरम पोळी सोबत मोगलाई दम आलू सर्व्ह करावे.
Recipe in marathi
    दम आलू रेसिपी 


Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 


टिप:साबुदाणा चिवडा रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/07/sabudana-chivdain-marathi.html

Comments

Popular Posts