दही वडा(dahi vada)recipe in marathi

साहित्य:
1 कप उडीद डाळ, 
1चमचा जिरे पावडर, 
1चमचा मिरे पावडर, 
1कप दही,
 5-6चमचे बारीक साखर,
 1कप पाणी किंवा ताक,
चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ लाल तिखट,
 चाट मसाला, 
हिरवी चटणी, 
तळण्यासाठी तेल
                                                     
Marathi recipe (मराठी रेसिपी)
दही वडा(dahi vada)recipe 


कृती:
4तास उडीद डाळ पाण्यात भिजवुन ठेवावी. 
नंतर पाणी काढून घ्यावे.
 थोडेसे पाणी घालून डाळ मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. 
हे मिश्रण इडलीच्या पीठापेक्षा घट्टसर हवे.
वाटलेले मिश्रण झटपट हाताने किंवा चमचाने 5मिनिटे एक सारखे फेटून घ्यावे. 
त्यामुळे वडे हलके होण्यास मदत होईल. 
या मिश्रणात थोडंस जिरे व मिरे पावडर तसेच मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे व मध्यम आचेवर गोल आकाराचे वडे बनवून तळून घ्यावेत. 
वडयाचा आकार मध्यम ठेवावा. खुप मोठा असेल तर वडे आतून कच्चे राहू शकतात.
एका बाॅउल मध्ये ताकात थोडे मीठ टाकून त्यात 10 मिनिटे वडे भिजवावे. 
वडे भिजेपर्यत एका बाॅउल मध्ये दही घेऊन त्याला थोडेसे सेल करून त्यात चवीनुसार मीठ व साखर घालून हलवून घ्यावे. 
भिजवलेले वडे हाताने दाबून पिळून घ्यावेत. 
एका डिश मध्ये वडे ठेवून त्यावर बनवलेले दही घालून त्यावर चाट मसाला, जिरे व मिरे पावडर, लाल तिखट, हिरवी चटणी घालून वेळ न दवडता झटपट दही वडा सर्व्ह करावे.
अशा प्रकारे आपला दही वडा तयार आहे. 

टिप:
1)डाळ 4-5तासापेक्षा जास्त वेळ भिजवुन ठेवू नये, कारण वडे तेल पकडतात. व तेलकट होतात.
2)वडे सर्व्ह करताने वरून बारीक शेव घालावी. 


Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

टिप:पाणी पुरी रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/06/pani-purirecipe-in-marathi.html

Comments

Popular Posts