आलू समोसे (aalu samosa)recipe in marathi
साहित्य:
250ग्रॅम बटाटे,
2मोठे कांदे बारीक चिरून,
आलं लसूण पेस्ट,
कोथींबीर,
चवीनुसार मीठ व तिखट,
2हिरव्या मिरच्या,
250ग्रॅम मैदा,
1लहान चमचा ओवा,
तळण्यासाठी तेल
आलू समोसे (aalu samosa)recipe in marathi |
कृती:
सर्व प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. नंतर झटपट त्याची सालं काढून घ्यावी व बटाटे बारीक करून घ्यावी.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे. त्यात मोहरी, जिरे तडकून घ्यावेत. व बारीक चिरून घेतलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतुन घ्यावा व आलं लसूण पेस्ट घालावी.
आता चवीनुसार मीठ व तिखट घालून फ्राय करावे. नंतर बारीक करून बटाटे टाकून चांगले एकजीव करून घ्यावे व 4-5मिनिटे मध्यम आचेवर ठेवून फ्राय करावे.
एका ताटात मैदा, ओवा व मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे व तेलाचे मोहन घालून कणीक मळून घ्यावी.
ही कणीक 5-10मिनिटे कपड्याने झाकून ठेवावी. नंतर गोल गोल गोल गोल लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करावेत व पुरी लाटावी व तिला मधोमध कापून घ्यावे व त्यात बटाट्याच्या फोडी घालाव्यात. आणि त्याचा कोन बनवून नीट पॅक करून घ्यावे. सगळे समोसे अशा प्रकारे बनवून घ्यावेत.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे व मध्यम आचेवर समोसे तळून घ्यावेत.
साॅस किंवा चटणी सोबत गरमागरम समोसे करावेत.
टिप:सोयाबीन चिल्ली रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/06/soyabean-chillirecipe-in-marathi.html
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you