रगडा पॅटीस (ragda Patti's)recipe in marathi
रगडा साहित्य:
1वाटी वाटणे,
2चमचे तेल,
चवीनुसार मीठ व तिखट,
1टोमॅटो,
गरजेनुसार पाणी,
2कांदे बारीक चिरून,
बारीक शेव,
कोथींबीर
रगडा कृती:
वटाणे 8-9 तास भिजवून नंतर कुकर मध्ये नरम होईपर्यंत शिजवून घ्यावे.
एका पातेल्यात 2चमचे तेल गरम करून त्यात लाल तिखट, मीठ, हळद घालून फोडणी करावी. त्यात शिजवलेला वटाणे घालून 2मिनिटे फ्राय करावे नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळून घ्यावे.
पॅटीस साहित्य:
250ग्रॅम बटाटे,
1लहान चमचा हळद,
चवीनुसार मीठ,
तेल
पॅटीस कृती:
बटाटे नरम होईपर्यंत शिजवून घ्यावेत.नंतर त्याची सालं काढून घ्यावी. व हाताने चांगले कुस्करून घ्यावे. यात थोडे मीठ व हळद घालून एकजीव करून घ्यावे व कणीक मळून घ्यावी.
त्याचे गोळे तयार करावेत व त्याला हातावर पुरी प्रमाणे चपटे करून घ्यावे.
एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात हाताने बनवलेले पॅटीस मध्यम आचेवर ठेवून फ्राय करावे नंतर एका डिश मध्ये पॅटीस ठेवून त्यावर रगडा, हिरवी चटणी, चिंच गुळ चटणी, शेव ,कांदा ,व कोथींबीर घालून सर्व्ह करावे.
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you