पुलाव (pulav)recipe in marathi

साहित्य:
2वाटी तांदूळ,
2कांदे,
1मध्यम आकाराचा बटाटा,
2टोमॅटो,
1शिमला मिरची,
 100ग्रॅम भेंडी,
 1कप हिरवे वटाणे,
कोथींबीर,
2वाट्या कोबी,
 1कप गाजर,
आलं लसूण पेस्ट,
चवीनुसार मीठ व तिखट,
तेल/तुप,
जिरे, 
मोहरी
                                                                  
Marathi recipes
Pulav(पुलाव)recipe 



कृती:
पुलाव बनवण्यासाठी सर्व प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत. 
त्यानंतर कुकर मध्ये 2कप पाणी घालून घालून त्यात तांदूळ शिजवून घ्यावेत.

सर्व भाज्या धुऊन बारीक चिरून घ्याव्यात. भाज्या 2-3मिनिटे भाज्या पाण्यात उकळून घ्याव्यात.

एका कढईत तेल गरम करत ठेवावे व त्यात मोहरी व जिरे घालून तडकून घ्यावेत. 
नंतर आलं लसूण पेस्ट घालून त्यात बारीक केलेला कांदा घालावा.
कांदा चांगला परतून झाला कि त्यात भेंडी फ्राय करून घ्यावी. 

त्यानंतर सर्व भाज्या फ्राय करून घ्याव्यात. भाज्या नरम झाल्यावर त्यात तिखट व मीठ चवीनुसार घालून घ्यावे. व शिजवलेला भात त्यात परतून घ्यावा. त्यावर कोथींबीर घालावी. 

गरमागरम  पुलाव झटपट सर्व्ह करावा.

टिप: 
1)तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता. तसेच भाज्याचे प्रमाण ही कमी जास्त करू शकतो. 
2) 
भात बनवताने पाणी कमी वापरल्यावर पुलाव छान व मोकळा होतो.



टिप :काजू करी/मसाला काजू रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/06/kaju-kairimasala-kajurecipe-in-marathi.html

Comments

Popular Posts