पाणी पुरी (pani puri)recipe in marathi

साहित्य:
1वाटी मोड आलेले मूग (मूग थोडे वाफवून घ्यावेत),
2उकडलेले बटाटे, 
5-6कप पाणी,
1/2कप चिंच, 
थोडा गुळ,
2हिरव्या मिरच्या, 
1चमचा जिरे पावडर,
 1/2लवंग पावडर, 
1/2मिरे पावडर, 
थोडेसे लाल तिखट ,
1/2लिंबू रस,
चवीनुसार मीठ,
1कप शेव,  
पुरी लाटण्यासाठी मैदा व तळण्यासाठी तेल
                                                             
Recipes in marathi
Pani puri(पाणी पुरी)recipe 

 

कृती:चिंच गरम पाण्यात भिजवुन चिंचेचा कोळ बनवून घ्यावा. त्यानंतर चिंचेचा कोळ व गुळ एकञ करून त्यात लवंग पावडर, जिरे मिरे पावडर, हिरवी मिरची, लाल तिखट व मीठ , तसेच लिंबाचा रस एकञ करून पाणी घालून पाणी पुरी साठी लागणारे पाणी बनवून घ्यावे. 
मैदयामधये मीठ घालून घट्टसर कणीक मळून घ्यावी. व छोट्या छोट्या पुरी लाटावी.व एका कढईत तेल गरम करत ठेवावे व त्यात पुरी बाउन रंगावर तळून घ्यावे.
सगळ्या पुरया वरच्या बाजूला फोडून त्यात मुग, बटाट्याचा चुरा,शेव  भरून पुरी मध्ये पाणी घालून सर्व्ह करावे. (आवडत असल्यास टोमॅटो सॉस घालावा,चव छान लागते. )
अशा प्रकारे झटपट  घरीच पाणी पुरी तयार आहे.

टिप:रगडा पॅटीस रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/06/ragda-pattisrecipe-in-marathi.html


Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

Popular Posts