मसाला वडी/पुडाची वडी(masala/pudachi vadi)recipe in marathi

आज आपण मसाला/पुडाची वडी झटपट कशी बनवायची ते बघूया त.ही वडी पोळी सोबत किंवा तशीही खाता येईल.

साहित्य:
1कप बेसन पीठ,गरम मसाला( 2चमचे फुल, 3चमचे धने,2चमचे खोबरे, 3-4लवंग व मिरे,2चमचे खसखस,1/2,)
जिरे,  कोथींबीर,
आलं लसूण पेस्ट,
चवीनुसार मीठ, 
लाल तिखट चवीनुसार, 
तळण्यासाठी तेल

कृती:
मसाला/पुडाची वडी बनवण्यासाठी सर्व प्रथम फुल, धने व सर्व गरम मसाला चांगला भाजून घ्यावा. त्यानंतर तो मिक्सर मधून काढून घ्यावा.

एका कढईत तेल गरम करत ठेवावे व त्यात जीरे टाकावे. नंतर त्यात लसूण पेस्ट घालावी. 
त्यात चवीनुसार मीठ व तिखट घालून फ्राय करावे. व नंतर 2कप पाणी घालून उकळून घ्यावे.
 चांगली उकळी आली की त्यात बेसन पीठ घालून घट्ट पिठले बनवून घ्यावे.

 एक सुती कापड ओले करून ते पोळपाटावर टाकावे. व पीठले त्या कापडावर पिठले टाकून त्याला गरम असतानेच हाताला पाणी लावून थापावे.

आता थापून  घेतलेल्या पिठल्यला बनवलेला गरम मसाला लावावा. व त्याची कपडयाचया सहाय्याने एकावर एक घडी टाकून घ्यावी. व त्याच्या वड्या कापून घ्याव्यात. 
त्यानंतर परत त्या वडयाना वरून मसाला लावून घ्यावा. व एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात वड्या शालो फ्राय कराव्यात. व गरम गरम मसाला/पुडाची वडी सर्व्ह करावी.
अशा प्रकारे आपली झटपट मसाला/पुडाची वडी रेसिपी तयार आहे. 
Marathi recipe
मसाला/पुडाची वडी (masala/pudachi vadi)recipe in marathi




टिप:कचोरी रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/05/kachorirecipe-in-marathi.html



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

Popular Posts