काजू करी/मसाला काजू (kaju curry/masala kaju)recipe in marathi

 साहित्य: 
200ग्रॅम काजू,
 1वाटी ओले खोबरे,
 2मोठे कांदे,
 आलं लसूण पेस्ट, 
कोथींबीर, 
2टोमॅटो,
 3चमचे तेल, 
चवीनुसार मीठ, 
चवीनुसार लाल तिखट,  
1/2 हळद ,
1चमचा जिरे पावडर

मसाला: 
2चमचे सांबर मसाला किंवा 2चमचे शाही पनीर मसाला वापरावा.

कृती:
काजू करी बनवण्यासाठी सर्व प्रथम काजू हलकेसे फ्राय करून घ्यावे.
 त्यानंतर कांदा बारीक चिरून घ्यावा. 
एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात 2टोमॅटो टाकून 3मिनिटे उकळून घ्यावे. व नंतर टोमॅटोची वरची साल काढून घ्यावी. 

आता मिक्सर मधून 10-15 काजू, साल काढून घेतलेला टोमॅटो, ओले खोबरे व बारीक चिरून घेतलेला कांदा काढून त्याची प्युरी बनवून घ्यावी. 

त्या नंतर एका कढई मध्ये तेल गरम करून त्यात जिरे पावडर घालावी. आल लसूण पेस्ट घालावी.
 त्यानंतर हळद, लाल तिखट व मीठ चवीनुसार घालून घ्यावे. 1/2कप दुधात काजू करी मसाला किंवा पनीर मसाला मिक्स करून त्याला चांगले फ्राय करावे. व त्या नंतर कांदा, टोमॅटो बनवलेली प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
Recipe in marathi
काजू करी/मसाला काजू (kaju curry/ masala kaju)recipe in marathi

आता त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून उकळून घ्यावे पाणी जास्त वापरू नये कारण काजू करीची ग्रेव्ही ही घट्ट असते.(साधारण 3कप पाणी पुरेसे आहे. ) 
या मिश्रणाला उकळी आली की त्यात काजू सोडून 3 मिनिटे मंद आचेवर ठेवून गॅस बंद करावा. व गरम गरम पोळी/पराठयासोबत काजू करी/मसाला काजू सर्व्ह करावे. 
अशा प्रकारे आपली झटपट काजू करी रेसिपी  तयार आहे.


टिप:मसाला वडी/पुडाची वडी रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/06/masalapudachi-vadirecipe-in-marathi.html



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

Popular Posts