चाॅकलेट बिस्किट केक,(chocolate biscuits cake)

Chocolate biscuits cake recipe



साहित्य: 
1पारले जी बिस्किट पॅक, 2ओरीओ बिस्किट पॅक, 1मोनॅको बिस्किट पॅक, 3-4 चमचे पिठी साखर, 1/2बेकिंग पावडर
 कव्हरीगसाठी साहित्य:3चमचे आइसिग शुगर, 2चमचे कोको पावडर 5-6चमचे दुध/पाणी
 
कृती:
मिक्सर मधून सर्व प्रथम बिस्किटची पावडर करून घ्यावे. त्यानंतर एका बाॅउल मध्ये बिस्किट पावडर,पिठी साखर घालावी व गरजेनुसार पाणी घालून मिश्रण एकजीव करून करून घ्यावे. जास्त पातळ किंवा खुप घट्ट करू नये.
                                                         
 कुकरची शिट्टी काढून घ्यावी व त्यात एक रिकामा डब्बा ठेवावा.एका डब्याला तेल लावून घ्यावे. बनवलेल्या मिश्रणात बेकिंग पावडर घालून चांगले एकजीव करून घ्यावे. व तेल लावलेल्या डब्यात हे मिश्रण टाकून कुकरचे झाकण लावून घ्यावे. 15-20मिनिटे मंद आचेवर ठेवल्यास केक रेडी होतो.
एका गरम पॅन वर आइसिग शुगर व कोको पावडर थोडे दूध किंवा पाणी घालून 3-4मिनिटे हलवून घ्यावे व थंड झाल्यावर केक वर सगळीकडून पसरून घ्यावे. अशा प्रकारे चाॅकलेट बिस्किट केक रेडी आहे.
टिप : 1)कोको पावडर नसेल तर 3डेरीमिलक कॅडबरी पॅन वर दुध टाकून मेलट करावे.व केकला वरून कव्हरीग करावे.

 2)चाॅकलेट बिस्किट केक साठी तुमच्या आवडीनुसार बिस्किट वापरू शकता.

अशा प्रकारे आपला झटपट चाॅकलेट बिस्किट केक रेडी आहे. 


टिप:चाॅकलेट केक रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/06/chocolate-cakerecipe-in-marathi.html



Pls subscribe Zatpat recipes marathi

Comments

Popular Posts