बिस्किट केक( Biscuit cake)recipe in marathi

लाॅकडाऊन काळात बाहेरील पदार्थ सगळेच जण टाळता येत. यामुळे बाहेरील पदार्थ खायला मिळत नाही म्हणून अनेकदा चिडचिड करताना दिसतात. त्यामुळेच आज आपण बिस्किट केक कसा बनवायचा ते बघणार आहोत.हा केक लहानापासून मोठयापर्यंत सर्वाना आवडेल.नक्की करून बघा.तो ही कुकरमधये झटपट ...
                                            

साहित्य:3पारले जी बिस्किट पॅक, 1कप दुध, 1चमचा दही,बेकिंग पावडर/खाण्याचा सोडा,3-4चमचे साखर
कृती:सर्व प्रथम साखर मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. त्यानंतर बिस्किट देखील मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. नंतर एका पातेल्यात बिस्किटची बारीक करून घेतलेली पावडर व बारीक साखर एकञ मिक्स करून घ्यावे. या मिश्रणात दही घालून नीट मिक्स करून घ्यावे व त्यात दुध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. दुध जास्त वापरू नये. केकचे बॅटर हे जास्त घट्ट किंवा जास्त पतले नसते.त्यामुळे गरजेनुसार दुध घालावे. हे मिश्रण हाताने चांगले फेटून घ्यावे. 
एका डब्याला आतून  तेल लावून घ्यावे. कुकरची शिट्टी काढून घ्यावी. व कुकर मध्ये आणखी एक रिकामा डब्बा ठेवावा. आता केक साठी बनवलेल्या बॅटर मध्ये बेकिंग सोडा मिक्स करून घ्यावा. व तेल लावलेल्या डब्यात हे मिश्रण टाकून कुकरमधये ठेवून कुकरचे झाकण लावून घ्यावे. 20-25 मिनिटे केक बनतो. केक बनला कि नाही हे त्यात पिन टाकून बघावे. पिन ला मिश्रण नाही चिटकले तर केक रेडी आहे. पण मिश्रण चिटकले तर आणखी थोडा वेळ केकला बेक होउ द्यावे. व थंड झाल्यावर सर्व्ह करावे. 


टिप:पुलाव रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/06/pulavrecipe-in-marathi.html
 


Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

Popular Posts